Navneet Rana : शिवसैनिकांमध्ये दम आहे की, हनुमान चालिसामध्ये, हे पाहावंच लागेल; नवनीत राणांचे थेट आव्हान

| Updated on: Apr 22, 2022 | 3:51 PM

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाहीत. सध्या राज्यावर वीजेचे संकट आहे. बेरोजगारी आहे. शेतकरी, शेतमजूरांचा प्रश्न आहे. त्यावर ते भाष्य करत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले. मंत्र्यांच्या कार्यालयात फाइलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल, तरीही ते मंत्रालयात येत नाहीत.

Navneet Rana : शिवसैनिकांमध्ये दम आहे की, हनुमान चालिसामध्ये, हे पाहावंच लागेल; नवनीत राणांचे थेट आव्हान
रवी राणा आणि नवनीत राणा.
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्र्यांनी पेशन्स ठेवले नाहीत. एवढे कष्ट करण्यापेक्षा दोन पावले पुढे या. मुख्यमंत्र्यांना सांगा कायदा सुव्यवस्था का बिघडवता. मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. हनुमान चालिसा वाचणार. शिवसैनिकात दम आहे की, हनुमान चालिसाच्या नावामागे, हे पाहावे लागेल. बाळासाहेब निघून गेले. त्यांच्यासोबत त्यांची विचारधाराही निघून गेली आहे, अशा शब्दांत शुक्रवारी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर शरसंधान साधले. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालिसेचा मुद्दा उचलल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य आज खार इथल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलेही काम करू नका, असे आवाहन करत नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात…

नवनीत राणा म्हणाल्या की, शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा वाचायला सांगावी. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाहीत. सध्या राज्यावर वीजेचे संकट आहे. बेरोजगारी आहे. शेतकरी शेतमजूरांचा प्रश्न आहे. त्यावर ते भाष्य करत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले. मंत्र्यांच्या कार्यालयात फाइलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल, तरीही ते मंत्रालयात येत नाहीत.

शिवसेनेकडून कायदा-सुव्यवस्थेचा भंग…

नवनीत राणा म्हणाल्या की, बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भाजत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच. इथेच वाढले. विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे शिवसैनिक माझे काही करू शकत नाहीत. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील, तर कायदा – सुव्यवस्थेचा भंग करण्याचे काम शिवसैनिक करत आहेत.

राऊत पोपट, त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही…

नवनीत राणा म्हणाल्या की, आता निवडणुका नाहीत. हा स्टंट नाही. निवडणुकीच्या तोंडावर केले असते, तर स्टंट समजला गेला असता. मी त्यांच्याच उमेदवाराला पाडून निवडून आले आहे. त्यामुळे मला कुणी शिकवू नये. 16-16 तास काम केल्यानंतर लोकांनी मला निवडून दिले आहे. राऊतांना मी पोपटच म्हणते . ते सकाळीसकाळी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही भाजपच्या बाजूने आहेत हे म्हणत असले, तरी त्यात तथ्य नाही. तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही कुणाच्या भरवश्यावर निवडून आलाय. मोदींच्या फोटोवर मते मिळाली. येणाऱ्या काळात गोव्यात मिळाली तेवढीच मते मिळतील.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!