मुंबई : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वार-प्रतिवार सुरू होते. रवी राणा यांनी आधी खोक्यांचा आरोप केला. बच्चू कडू यांनी पुरावे मागितले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायला हिंमत असल्याचं रवी राणा म्हणाले. त्यांनी तलवार घेऊन द्यावं, मी तयार आहे, असं बच्चू कडू यांना प्रतिउत्तर दिलं. नंतर रवी राणा म्हणतात, तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे. बच्चू कडू यांनीही तो वाद मिटला असल्याचं सांगितलं.
रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर वाद मिटल्याचं म्हटलं. कोणी कोणत्याही शब्दाचं वेगळे अर्थ पकडू नये. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे आदेश माझ्यासाठी सर्वस्व असल्याचं रवी राणा म्हणाले. विकासात्मक कामात लक्ष देणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. वाद-विवादात काही पडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वाद पेटला नाही नि मिटला पण नाही. कोथळा बाहेर काढण्याची भाषण मी काय एकटा करतो महाराष्ट्रात. बोलताना मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. याच्यानंतर वाद झाला तर ते भाषण आहे. घरात जाऊन मारणं, बोलणं हे फार सोप आहे. सामान्य माणसाच्या हिताचे असते तर वाद वाढविले असते. यात सामान्य माणसाचं हित कुठचं दिसत नाही. बच्चू कडू यांनीही वाद नाही, असंच म्हंटलं.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. ते जसे बोलतील तसं आम्ही करतो. दोन्ही आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. वाद सोडून आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, असं मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.