Nawab Malik Arrested LIVE Updates : आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते: सुप्रिया सुळे

| Updated on: Feb 24, 2022 | 12:25 AM

Nawab Malik News LIVE Updates राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती.

Nawab Malik Arrested LIVE Updates : आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते: सुप्रिया सुळे
Nawab Malik Arrested by ED Today
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जे जे रुग्णालयात पोहोचेले होते. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात आल्यानंतर त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Feb 2022 10:14 PM (IST)

    नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची निदर्शनं, चंद्रकांत पाटील यांची माहिती

    नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी उद्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर निदर्शने

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

  • 23 Feb 2022 10:01 PM (IST)

    आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते: सुप्रिया सुळे

    भाजप मध्ये गेल्यावर ED, CBO मागे लागत नाही असे इंदापुरातील नेते म्हणाले

    विरोधात असले की इडी आणि भाजपत आले की घोटाळा नष्ट होतो असे औषध सांगा

    – अमित शहा देशा गृहमंत्री आहेत

    – अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत

    – विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा

    – ईडीचा पेपर फुटतो त्यांच्यावर कारवाई का होत नाही

    -महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे

    – दिल्लीची माणसे अपमान करतायत

    – मी दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही

    — लढेंगे जरुर जितेंगे जरुर

    आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते

    – पहिली नोटीस आलेव आणि महाराष्ट्रात सरकार आले

    – झेडपीत आम्ही त्यांना झिरोवर आणणार आहे

    – काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते

    – आम्ही तुमच्यामागे ईडी वगैरे लावणार नाही

    – तिसरी नोटीस आली की देशात सत्ता येईल

    – देशामध्ये कोणीही आरोप केला तेव्हा इंदापूरमधील जनता साहेबांसोबत राहिले

  • 23 Feb 2022 09:10 PM (IST)

    ईडीची कारवाई नियमानुसार, टेरर फंडिंगची लिंक योग्यच : देवेंद्र फडणवीस

    हा प्रकार संपूर्ण गंभीर आहे. ईडी आणि एनआयएनं गेल्या काही दिवसांमध्ये जॉईंट ऑपरेशन केली आहेत.

    या प्रकरणी ईडीनं 9 ठिकाणी ईडीनं सर्च केला. त्यातून अनेक लिंक्स बाहेर आलेल्या आहेत

    त्यातील एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे

    नवाब मलिक यांनी जमीन घेतलीय ती सरदार वली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे त्यांच्याकडून ही जमीन घेतलीय.

    जमिनीच्या मालकांनी त्यांना एकही पैसा मिळाला नाही, असं सांगण्यात आलंय

    अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी मागण्यात आलीय आणि नंतर बदण्यात आली

    25 लाख रुपयांचा सौदा झाला पण एकही रुपये देण्यात आले नाहीत

    हसीना पारकरला 55 लाख रुपये देण्यात आले याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत

    ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीनं नवाब मलिकांना मिळाली

    पैसे अंडरवर्ल्डला गेले, ते पैसे  हसीना पारकर आणि दाऊदला मिळाले

    एखाद्या मंत्र्यांनं मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन विकत घेण्याचं कारण काय

    हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीन वेळा हल्ले झाले आहेत

    मुंबईत जे हल्ले करतात, त्यांना आपण पैसे देणार असू तर ते निंदनीय आहे

    मूळ मालक, जेलमध्ये आहेत त्यांचा जबाब घेतला आहे

    ईडीनं  केलेली कारवाई नियमानूसार

    टेरर फंडिंग हा अँगल स्पष्टपणे दिसतोय

    दाऊद आणि त्याच्या बहिणीशी कसा व्यवहार करु शकतं

    या संपूर्ण प्रकरणात हे गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षानं राजकारण न करता

    मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन घेतली जात असेल तर त्याचा राजकीय पक्षानं राजीनामा घेतला पाहिजे

  • 23 Feb 2022 09:02 PM (IST)

    नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची : समर्थक

    नवाब मलिक यांच्या बाजूनं युक्तिवाद करताना अमित देसाई यांनी कारवाई कशी चुकीची आहे, हे दाखवून दिलं आहे. नवाब मलिकांना अटक केलीय ती असंविधानिक आहे, असं नवाब मलिक समर्थकांनी म्हटलं आहे.

  • 23 Feb 2022 08:56 PM (IST)

    नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात (PMLA Court) 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. ईडीकडून अनिल सिंग यांनी युक्तिवाद करण्यात आला. तर, नवाब मलिक यांच्यावतीनं अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. ईडीनं नवाब मलिक यांच्य 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केलीय. विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक यांना विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांना PMLA  कोर्टानं 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

  • 23 Feb 2022 08:06 PM (IST)

    नवाब मलिक केंद्र सरकार विरोधात बोलतात म्हणून अटक : छगन भुजबळ

    मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज अतिशय पहाटे आमचे सहकारी मंत्री नवाब मलिक  यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तपास केल्यानंतर ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर अटक करण्यात आली. दोन्ही बाजूनं कोर्टात युक्तिवाद आणि चर्चा झाली.

    1992 च्या घटना, 1999 साली त्या जागेचा करार, त्यानंतर  बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. ज्यावेळी पीएमएलएचा जन्म नव्हता. त्यावेळची घटना आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक लोक जेलमध्ये गेले, फाशी झाली.

    गेल्या 30 वर्षात नवाब मलिक यांचं नाव आलं नाही. नवाब मलिक भारत सरकारच्या अन्यायाच्या धोरणाविरोधात बोलतात. निडरपणे ते बोलतात त्यांचं तोडं बंद करण्यासाठी हा प्रयत्न आहे.

    एफआयआर झाल्याशिवाय ईसीआयर होत नाही. 14 फेब्रुवारी रोजी ईसीआयआर एनआयएकडून करण्यात आला. त्यानंतर त्यावर अटक करण्यात आली.

    नवाब मलिकांच्या वकिलांनी आरोप फेटाळले आहेत.

    सलीम पटेल आणि सलीम फ्रुट आहे. सलीम फ्रुट आहे तो वारला आहे. हसीना पारकर वारल्या आहेत.

    वडाची साल पिंपळाला लावयाची आणि अटक करायची  आणि तिन्ही पक्षांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न

    या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीविरोधी हा प्रकार आहे. बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे

    एकत्रितपणे तिन्ही पक्ष  याविरोधात लढणार,  जनतेत जाणार आहोत

    राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही, नारायण राणे  यांना देखील अटक झाली होती , त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं का?

    जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही, केंद्राची यंत्रणा सांगतेय, विशिष्ट हेतूनं सांगतेय म्हणून राजीनामा घ्यायला पाहिजे हे आम्हाला पटत नाही, जोपर्ंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही

  • 23 Feb 2022 07:49 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आंदोलन करणार

    नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आंदोलन करणार

    महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठिशी राहणार

    उद्या सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन

  • 23 Feb 2022 07:41 PM (IST)

    नवाब मलिक यांचा राजीनामा नको, लढू आणि जिंकू : संजय राऊत

  • 23 Feb 2022 07:34 PM (IST)

    कोठडीचा कोणताही निर्णय झाला तरी राजीनामा नको: राष्ट्रवादी काँग्रेस

    नवाब मलिक यांच्या कोठडीचा कोणताही निर्णय झाला तरी राजीनामा नको

    राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

    वर्षावरील बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष

     

  • 23 Feb 2022 07:29 PM (IST)

    पीएमएलएच्या कलम 19 द्वारे अटक करण्यात आलीय : अनिल सिंग

    पीएमएलएच्या कलम 19 द्वारे अटक करण्यात आलीय : अनिल सिंग

    अर्णेश कुमार निकाल या केसला लागू होत नाही,  तो सीआरपीसीला लागू होतो

    इतर आरोपांची अटक यावर बोलताना तो तपास यंत्रणेच्या कक्षेतील निर्णय आहे, तो तुमचा नाही

    हसीना पारकरकडून दाऊद याला पैसे गेलेत असा माझं मत आहे

     

  • 23 Feb 2022 07:26 PM (IST)

    अनिल सिंग यांच्याकडून युक्तिवाद सुरु

    अनिल सिंग यांच्याकडून युक्तिवाद सुरु

    हा रिमांड वरील युक्तिवाद असून डिस्चार्ज अर्जावरील नाही

    पीएमएलए कायद्यातील कलमाचं वाचन

    नवाब मलिक यांच्याकडे त्या मालमत्तेचा अजूनही ताबा

    वेळ गेला म्हणून बेकायदेशीर मालमत्ता कायदेशीर होत नाही

  • 23 Feb 2022 07:24 PM (IST)

    रिमांडच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेऊ, NCP चा सावध पवित्रा

    रिमांडच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेऊ

    राष्ट्रवादी काँग्रेसची सावध भूमिका

    राज्य सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न

    कोर्ट काय निर्णय देत हे पाहून आपण पावलं उचलावीत

    शिवसेना मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,  बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित

  • 23 Feb 2022 07:20 PM (IST)

    कोर्टाला आरोपीला मुक्त करण्याचा अधिकार आहे: अमित देसाई

    कोर्टाला आरोपीला मुक्त करण्याचा अधिकार आहे

    कलम 41 चं तपासयंत्रणांकडून समाधान झालेलं नाही

    अमित देसाई यांच्याकडून विविध कोर्टाच्या केसेसचा दाखला

    अमित देसाई यांच्याकडून आता कोर्टाची जबाबदारी असल्याचं म्हटलंय

    मद्रास हायकोर्टाच्या निकालाचा देसाई यांच्याकडून दाखला

    दंडाधिकारी हे राजद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात पाठवू शकतात, असा युक्तिवाद तेखील त्यांनी केलाय.

  • 23 Feb 2022 07:16 PM (IST)

    शरद पवार वर्षा निवासस्थानी पोहोचले

    शरद पवार वर्षा निवासस्थानी पोहोचले

    दिलीप वळसे पाटील देखील पोहोचले

    अशोक चव्हान, छगन भुजबळ  देखील पोहोचले

     

  • 23 Feb 2022 07:15 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा स्थगित

    – मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

    – नवाब मलिक यांना कोणतीही सूचना न देता ईडीचे अधिकारी मलिकांना घेऊन गेले

    – त्यांना युक्तिवाद करण्याची संधी नवाब मलिकांना मिळायला हवी.

    – मलिकांकर होणाऱ्या कोणत्याही आरोपात तथ्य नसणार आहे

    – राज्यात मंत्री असणाऱ्या लोकांना अचानक अटक करणे योग्य नाही

    – उद्यापासून होणारी परिवार संवाद यात्रा मी परिवार संवाद यात्रा स्थगित केली आहे.

    – माळशिरस मधून इंदापूरमार्गे मी मुंबईला जाणार आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत बसून पुढील चर्चा करणार

    – मंत्र्यांना अटक केली म्हणून राजीनामा देत बसणे योग्य नाही.

    – कोणीतरी कुठली तरी एजन्सी आरोप करते म्हणून मंत्र्यांनी राजीनामे देत बसायचे का?

    – संकट आलेले आहे मात्र महाविकास आघाडीचे नेते त्याला उत्तर देण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करतील

    – सर्व मार्गांचा वापर करून झाल्यावर एजन्सीचा वापर करण्याशिवाय मार्ग नाही त्यामुळे ते करत असतील

  • 23 Feb 2022 07:13 PM (IST)

    ममता बॅनर्जींचा शरद पवार यांना फोन, पवार वर्षा निवासस्थानाकडे रवाना

    ममता बॅनर्जींचा शरद पवार यांना फोन,

    शरद पवार वर्षा निवासस्थानाकडे रवाना

    वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक

    राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

  • 23 Feb 2022 07:12 PM (IST)

    नवाब मलिक यांच्याकडे कागदपत्र मागितील असती तर त्यांनी दिली असती

    नवाब मलिक हे मंत्री आहेत, त्यांच्याकडे कागदपत्र मागितली असती तर त्यांनी दिली असती

    त्यांच्या अटकेतून काय मिळवलं,

  • 23 Feb 2022 07:09 PM (IST)

    अमित देसाई यांच्याकडून अर्नेश कुमार यांच्या केसचा दाखला

    देसाई यांच्याकडून अर्नेश कुमार यांच्या केसचा दाखला

  • 23 Feb 2022 07:06 PM (IST)

    हा देश कायद्यावर चालतो, ईडी अधिकारी नीरज कुमार यांच्या रिमांड अर्जावर प्रश्नचिन्ह : अमित देसाई

    मला ईडीचे अधिकारी निरज कुमार यांचा अनादर करायचा नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोषी ठरवण्यासंदर्भात हा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमचा आदर करण्याची गरज नाही.

    हा देश हा रुल ऑफ लॉवर चालतो. आम्हीच जर यामध्ये अयशस्वी ठरलो तर आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाही. नवाब मलिकांना जेलमध्ये पाठवणं हे चुकीचं ठरेल, असं अमित देसाई यांनी म्हटलंय

  • 23 Feb 2022 07:02 PM (IST)

    मोहित कंबोज याच्या निवास्थानी पोलीस पोहोचले

    मोहित कंबोज याच्या निवास्थानी पोलीस पोहोचले

    नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मोहित कंबोज यानं तलवार उंचावली

     

  • 23 Feb 2022 07:00 PM (IST)

    न्यायालय देखील दोषी ठरवण्यासाठी वर्षांचा कालावधी घेतात, तीन तासात दोषी कसं ठरवलं

    अमित देसाईंकडून रिमांड अर्जावर आक्षेप

    न्यायालय देखील दोषी ठरवण्यासाठी वर्षांचा कालावधी घेतात, तीन तासात दोषी कसं ठरवलं

  • 23 Feb 2022 06:56 PM (IST)

    अमित देसाईंचा जोरदार युक्तिवाद सुरु

    रिमांड अर्जात पीएमएलएच्या शेड्यूल संदर्भातील आरोप कुठं आहे

    गंभीर प्रकरण असेल तर पीएमएलए अर्ज कऱण्याची  गरज नाही, असं देखील अमित देसाई यांचा युक्तिवाद

  • 23 Feb 2022 06:51 PM (IST)

    तुम्ही सकाळी अटक करण्यासाठी आला होता, आता तुम्ही टेरर फंडिंगवर बोलत आहात: अमित देसाई

    रिमांड अर्जातील भाषेवर आक्षेप आहेत

    न्यायालयाची दारं आम्ही ठोठावू शकतो

    हे काही हिंदी चित्रपटाचं कथानक नाही

    उद्या टेरर फंडिगंच्या बातम्या चालवल्या जातील

    नवाब मलिक गेल्या 25 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत

    नवाब मलिक कोण आहेत हे त्यांच्या मतदारांना माहिती आहेत

    तुम्ही पुरावे मिळवले, तुम्ही कागदपत्रं गोळा केली, त्यांना दोषी मानलं, मात्र, अशी वक्तव्य करु नका

    तुम्ही सकाळी अटक करण्यासाठी आला होता, आता तुम्ही टेरर फंडिंगवर बोलत आहात

    न्यायालयानं या संदर्भात गंभीर दखल घ्यावी : अमित देसाई

    इकबाल कासकरला नवाब मलिक यांचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला

  • 23 Feb 2022 06:50 PM (IST)

    रिमांडमधील टेरर फंडींगवर अमित देसाईचा आक्षेप

    रिमांडमधील टेरर फंडींगवर अमित देसाईचा आक्षेप

    ही हिंदी फिल्मची स्क्रिप्ट नाही

     

  • 23 Feb 2022 06:45 PM (IST)

    2005 मध्ये कोणती संपत्ती ही 300 कोटींची होती : अमित देसाई

    2005 मध्ये कोणती संपत्ती ही 300 कोटींची होती

    मी आज कल्पना करतोय, नंतर वास्तवात आलो

  • 23 Feb 2022 06:43 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्षा कडे रवाना

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्षा कडे रवाना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

    अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात , सुनील केदार उपस्थित राहणार

  • 23 Feb 2022 06:42 PM (IST)

    प्रॉपर्टी खरेदी केली नसून ते करार अ‌ॅग्रीमेंट : अमित देसाई

    नवाब मलिक यांनी ती प्रॉपर्टी हसीना पारकर यांच्याकडून खरेदी केल्याचं म्हटलं जातंय

    मात्र, कराराचं अॅग्रीमेंट असल्याचा अमित देसाईंचा युक्तिवाद

  • 23 Feb 2022 06:39 PM (IST)

    सिल्वर ओकवरील बैठक संपली, आता मुख्यमंत्री शरद पवार यांच्या बैठकीकडे लक्ष

    सिल्वर ओकवरील बैठक संपली,

    आता मुख्यमंत्री शरद पवार यांच्या बैठकीकडे लक्ष

    अशोक चव्हाण यांचा काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांना फोन

    राजकीय घडामोडींना वेग

  • 23 Feb 2022 06:31 PM (IST)

    गेल्या 15 वर्षांपासून तम्हाला भाडं मिळालं नाही, तुम्ही काहीचं केलं नाही : अमित देसाई

    2022 मध्ये त्या 20 वर्षांसंदर्भात जबाब देत आहेत की त्यांना माहिती नााहीय

    गेल्या 15 वर्षांपासून तम्हाला भाडं मिळालं नाही, तुम्ही काहीचं केलं नाही

    नवाब मलिक हे गँगचे सदस्य नाहीत मग त्यांच्या विरोधात गुन्हा का? असा, अमित देसाई यांचा युक्तिवाद

    सज्जन माणसावर पीएमएलए कलम लावण्यात  येतंय हे चुकीचं

    इक्बाल कासकर यांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही

    या प्रकरणात इतर कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही

  • 23 Feb 2022 06:30 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन

    -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता फक्त चौकशी करत अटकेचे पडसाद पिंपरी चिंचवड देखील उमटले

    -पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ईडीच्या कारवाई विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलंय

    -डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोदी सरकार व ईडी प्रशासना विरोध केंद्र सरकार जब जब डरती हे तब ईडी को आगे करती हे मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आलं

  • 23 Feb 2022 06:24 PM (IST)

    मुनिरा यांची तक्रार ही सलीम पटेल याच्या विरोधात असेल तर नवाब मलिक यामध्ये कसे आले : देसाई

    जर मुनिरा यांची तक्रार ही सलीम पटेल याच्या विरोधात असेल तर नवाब मलिक यामध्ये कसे आले

    नवाब मलिक हे स्वत: यामधील अन्याय झालेले व्यक्ती आहेत

    ज्या व्यक्तीच्या नावानं मालमत्ता नाही त्यानं त्यांना ती मालमत्ता विकलीय

  • 23 Feb 2022 06:21 PM (IST)

    मुनिरा यांना नवाब मलिकांना मालमत्ता कुणी विकली माहिती नाही: अमित देसाई

    पीएमएलए लावताना तुमच्याकडे अन्याय झालेली व्यक्ती असायला हवी

    मुनिरा या जबाबात सांगतात की नवाब मलिक यांना मालमत्ता कोणी विकली हे माहिती नाही. मग गुन्हा घडलाच नाही.

    अमित देसाईंचा जोरदार युक्तिवाद

  • 23 Feb 2022 06:18 PM (IST)

    रिमांडच्या मागणीवर अमित देसाईंचा जोरदार युक्तिवाद

    रिमांडवर अमित देसाईंचा युक्तिवाद

    एका परिच्छेदात तुम्ही म्हणता सलीम फ्रुटच्या म्हणण्यानुसार हसीना पारकरनं जमीन नवाब मलिकांना विकली

    दुसऱ्या परिच्छेदात तुम्ही म्हणता मुनिराची संपत्ती लुबाडली

    न्यायालय हे फॅक्टवर चालतं, असं अमित देसाई म्हणाले

  • 23 Feb 2022 06:15 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अलर्ट जारी करण्यात आलाय

    नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अलर्ट जारी करण्यात आलाय

    गृहमंत्रालायकडून हा अलर्ट देण्यात आला आहे

    गृह विभागाकडून खबरदारी

  • 23 Feb 2022 06:10 PM (IST)

    रिमांड विरोधात देसाईंचा युक्तिवाद सुरु

    रिमांड विरोधात देसाईंचा युक्तिवाद

    आम्ही दाऊद गँगशी संबधित नाही

    सलीम पटेल संदर्भात संभ्रमात असल्याचा अमित देसाईंचा युक्तिवाद

  • 23 Feb 2022 06:08 PM (IST)

    अमित देसाईंनी नवाब मलिकांना बोलण्यापासून थांबवलं

    पीएमएलएच्या अंतर्गत असणाऱ्या 2017 आणि 2019 च्या ईसीआयरचा अमित देसाईंकडून उल्लेख

    सलीम पटेलचा उल्लेख करताना ईडी संभ्रमात असल्याचा युक्तिवाद

    सलीम पटेल (फ्रुट) चा उल्लेख करतेय मग त्याचं नाव एफआयआरमध्ये का?

    अमित देसाईंनी नवाब मलिकांना बोलण्यापासून थांबवलं

  • 23 Feb 2022 06:02 PM (IST)

    Amit Desai : महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी देशविरोधी कारवायांमध्ये असल्याचा पर्सेप्शन तयार करण्याचा प्रयत्न

    महाराष्ट्र राज्याचा लोकांच्यामधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं पर्सेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा युक्तिवाद अमित सिंग यांनी केला.

  • 23 Feb 2022 06:00 PM (IST)

    दाऊदची ओळख 30 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यासाठी, 3 फेब्रुवारीला गुन्हा : अमित देसाई

    दाऊद इब्राहिम विरोधातील एफआयआर कोणी पाहिलेला नाही

    दाऊदची ओळख 30 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यासाठी आहे

    मात्र, आता 3 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करता

    मलिक यांच्याकडे आरोपांसदर्भात काहीही सापडलं नाही

  • 23 Feb 2022 05:52 PM (IST)

    नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु

    नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु

    सरकारी वकील 1999 च्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा उल्लेख करत आहेत

    त्यापूर्वी कायदा अस्तित्त्वात आला नव्हता.

    1999 आणि 2003 मध्ये पीएमएलए कायदा अस्तित्त्वात नव्ह्ता

    संविधान सांगतं रेट्रोस्पेक्टिव्ह क्रिमीनल लॉ वापरू सखत नाहीत

    तुम्ही 20 वर्ष थांबला आणि आता 14 दिवसांसाठी कोठडी मागता

    तुम्हाला असलेल्या अटकेच्या अधिकाराचा वापर करता

    कायद्याच्या चौकटीत राहून ते करण्यात यावं

    कोर्टानं ही अटक बेकायदेशीर असल्याचं जाहीर करावं

    पीएमएलएच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु

  • 23 Feb 2022 05:47 PM (IST)

    ईडीकडून नवाब मलिक यांच्या 15 दिवसांच्या कोठडीची मागणी 

    गोवावाला कंम्पाऊंडच्या प्रॉपर्टीची किंमत 3.3 कोटी रुपये होती. मात्र, ती केवळ 50 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. अवैधपद्धतीनं पॉवर ऑफ अटॉर्नी करण्यात आली त्यांना आता मालमत्तेचा विकास करायचा आहे.

    ईडीकडून नवाब मलिक यांच्या 15 दिवसांच्या कोठडीची मागणी

  • 23 Feb 2022 05:45 PM (IST)

    मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने

    मोदी सरकारचा केला निषेध व्यक्त

    अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवरून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जळगावातही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हाताला काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

  • 23 Feb 2022 05:43 PM (IST)

    ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा : अनिल सिंग

    हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग

    यामुळं ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल

    55 लाखांची रक्कम यासाठी देण्यात आली

  • 23 Feb 2022 05:34 PM (IST)

    अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

    नवाब मलिक यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात शरद पवार यांच्या भेटीला

    शरद पवारांनी बोलावलीय महत्त्वाची बैठक

  • 23 Feb 2022 05:27 PM (IST)

    Anil Singh : मूळ मालकांना एकही पैसा मिळाला नाही

    मालमत्तेसंदर्भात काही माहिती देण्यात आली नव्हती असं मुनिरा हिनं ईडीला सांगितलं.

    मूळ मालकांना एक रुपया दिला गेला, असं दाखवण्यासाठी काहीही नाही.

    सलीम पटेलनं अनधिकृतपणे जमीन विकली.

  • 23 Feb 2022 05:24 PM (IST)

    माध्यमातून जमीन विक्री झाल्याचं मुनिरा यांना समजलं : अनिल सिंग

    मुनिरा आणि तिच्या बहिणीनं विक्रीचे अधिकार दिले नव्हते

    सरदार खान हा भाडे गोळा करणारा व्यक्त होता

    माध्यमातून जमीन विक्री झाल्याचं समजलं

    मुनिरा आणि मरियम यांना जमीन नवाब मलिक यांच्या एका कंपनीला विकली गेल्याचं समजलं

  • 23 Feb 2022 05:20 PM (IST)

    सिल्वर ओक वर बैठक सुरु

    सिल्वर ओक वर बैठक सुरु

    राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक

    सर्व मंत्री उपस्थित

    नैतिकतेच्या मुद्यावर नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता

  • 23 Feb 2022 05:19 PM (IST)

    हसीना पारकरनं सलीम पटेलला पॉवर ऑफ अटोर्नी केलेलं

    सलीम पटेलला हसिना पारकरनं पॉवर ऑफ अटोर्नी दिली होती.

    अतिक्रमण काढण्यासाठी जमीन विक्री करु नये असं सांगण्यात आलं होतं.

    सरदार खान हा 1993 च्या स्फोटातील दोषी होता. त्याचाही यामध्ये सहभाग होता.

    अली शाह हा हसीना पारकर हिचा मुलगा

  • 23 Feb 2022 05:16 PM (IST)

    Nawab Malik hearing : नवाब मलिक यांना घरीच ताब्यात घेण्यात आलं : अमित देसाई

    Nawab Malik hearing : नवाब मलिक यांना घरीच ताब्यात घेण्यात आलं : अमित देसाई

  • 23 Feb 2022 05:11 PM (IST)

    Nawab Malik : मुनिरा आणि मरियम यांची मालमत्ता बळकावली

    मुनिरा आणि मरियम यांची जमीन बळकावली

    मुनिरा आणि मरियम यांच्या पालकांची मालमत्ता होती

    मात्र, त्यांचाकडून हसीना पारकर हिनं ती बळकावली

    त्याद्वारे निधी उभारला

    अनिल सिंग यांची  कोर्टात मांडणी

  • 23 Feb 2022 05:10 PM (IST)

    नवाब मलिक समर्थक कोर्टाबाहेर जमण्यास सुरुवात

    नवाब मलिक समर्थक कोर्टाबाहेर जमण्यास सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळापासून आक्रमक

    पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूला थांबण्यास सांगितलं

  • 23 Feb 2022 05:06 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना सिल्वर ओकवर येण्याचे आदेश

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना सिल्वर ओकवर येण्याचे आदेश

    नवाब मलिक यांच्या अटकेनंतर तातडीनं  निर्णय

    राजकीय घडामोडींना वेग

    अजित पवार देखील सिल्वर ओक वर उपस्थित राहणार

  • 23 Feb 2022 05:05 PM (IST)

    अनिल सिंग यांच्याकडून रिमांडचं वाचन

    अनिल सिंग यांच्याकडून रिमांडचं वाचन

     

  • 23 Feb 2022 05:04 PM (IST)

    जयंत पाटील मुंबईकडे रवाना 

    हसन मुश्रीफ, राजेश टोपे मुंबईतील सिल्वर ओक वर

    जयंत पाटील मुंबईकडे रवाना

  • 23 Feb 2022 05:00 PM (IST)

    3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद कासकर विरोधात गुन्हा आणि एफआयर दाखल

    अनिल सिंग यांचा युक्तिवाद
    3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद कासकर विरोधात गुन्हा आणि एफआयर दाखल करण्यात आला

    दाऊद इब्राहिम कासकर हा दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी

    अनधिकृतपणे संपत्ती बळकावून दहशत माजवण्याच्या प्रयत्नात त्याचा सहभाग

    हसीना पारकर  दाऊदचं कामकाज पाहत होती, तिचा मृत्यू झालाय

    हसीना पारकर हिनं गोवावाला कंम्पाऊंडमधील जमीन बळकावली होती

    ती संपत्ती हसीना हिनं मुनिरा आणि मरियमकडून घेतली होती

  • 23 Feb 2022 04:57 PM (IST)

    Nawab Malik hearing : फक्त वकिलांनी कोर्टरुममध्ये उपस्थित राहावं, ईडीचे वकील

    फक्त वकिलांनी कोर्टरुममध्ये उपस्थित राहावं, ईडीचे वकील

    नवाब मलिक यांच्या बाजूनं अमित देसाई युक्तिवाद करणार

    ईडीकडून अनिल सिंग यांच्याकडून युक्तिवाद

  • 23 Feb 2022 04:55 PM (IST)

    मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं

    समन्स न देता ईडीचे अधिकारी घेऊन आले

    नवाब मलिक यांची अमित देसाई यांना माहिती

    ईडी कार्यालयात सही करण्यास सांगितलं

    मला ताब्यात घेऊन आणण्यात आलं.

  • 23 Feb 2022 04:50 PM (IST)

    नवाब मलिक यांना कोर्टात आणलं गेलं

    नवाब मलिक यांना कोर्टात आणलं गेलं

    अमित देसाई आणि नवाब मलिक यांच्यात पाच मिनिटं चर्चा होणार

    त्यानंतर युक्तिवादाला सुरुवात

    नवाब मलिकांना कोर्टरुम नंबर 54 मध्ये आणण्यात आलं.

  • 23 Feb 2022 04:48 PM (IST)

    कोर्टरुममधील गर्दी कमी करा, न्यायाधीशांचे आदेश

    न्यायाधीश रोकडे यांच्याकडून पोलिसांना गर्दी कमी करण्याचे आदेश

    ईडीकडून अनिल सिंग युक्तिवाद करणार

    ईडीकडून रिमांडच्या फोटो कॉपीवर सुनावणी करण्याची मागणी

     

     

  • 23 Feb 2022 04:42 PM (IST)

    विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी

    विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी

    प्रथम ईडीकडून युक्तिवाद

    ईडीकडून अनिल सिंग युक्तिवाद करतील

    बचाव पक्षाकडून अमित देसाई युक्तिवाद करणार

    अमित देसाई काय युक्तिवाद करतात हे पाहावं लागणार

  • 23 Feb 2022 04:41 PM (IST)

    नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं

    नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं

    कोर्टरुममध्ये गर्दी झालीय, अमित देसाई

  • 23 Feb 2022 04:36 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपकडून जल्लोष

    नवाब मालिकांना अटक केल्याप्रकरणी परभणीत भाजपकडून फटाके फोडून जल्लोष साजरा ,

    मुख्यमंत्र्यांनी मलिक यांचा राजीनामा मागे घेण्याची भाजपची मागणी ,

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात भाजपकडून फोडण्यात आले फटाके .

  • 23 Feb 2022 04:35 PM (IST)

    नवाब मलिक यांची बहिण सहिदा खान कोर्टात हजर

    नवाब मलिक यांची बहिण सहिदा खान कोर्टात हजर

    सहिदा खान या नगरसेविका

    नवाब मलिकांना गाडीत बसवून ठेवलं

     

  • 23 Feb 2022 04:29 PM (IST)

    नवाब मलिक यांच्याकडून ज्येष्ठ वकील अमित देसाई तर ईडीचे वकिल कोण?

    नवाब मलिक यांच्याकडून ज्येष्ठ वकील अमित देसाई तर ईडीकडून अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत.

    डी कनेक्शनमध्ये मनी लॉँड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास

    मुंबईत दाऊदचे हस्तक म्हणून जे काम करत आहेत त्याचा ईडीकडून तपास

    इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर मनी लाँंड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक

  • 23 Feb 2022 04:26 PM (IST)

    उस्मानाबादमध्ये भाजप व इडीचा राष्ट्रवादीकडून निषेध

    मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बोंब मारो आंदोलन

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कार्यकर्ते यांची घोषणाबाजी

    भाजप व इडीचा राष्ट्रवादीने केला निषेध

    मातीचे गाडगे फोडून केला निषेध

  • 23 Feb 2022 04:20 PM (IST)

    राजकीय बदल्याची भावनेतून कारवाई दिसतेय : संजय राऊत

    कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक होईल

    नवाब मलिक यांच्या बद्दल अधिक माहिती कोर्टात मिळेल

    राजकीय बदल्याची भावना यातून दिसून येत आहे

    महाराष्ट्र, झारखंडमध्ये यंत्रणा सक्रिय झाल्यात

    ही कायदेशीर लढाई सुरु  आहे

  • 23 Feb 2022 04:18 PM (IST)

    ज्या पद्धतीनं हे घडतेय ते सूडचक्र : जितेंद्र आव्हाड

    ज्या पद्धतीनं हे घडतेय ते सूडचक्र : जितेंद्र आव्हाड

    केंद्रीय यंत्रणाचा वापर स्वैरपद्धतीनं

    यामध्ये लोकशाहीचा खून पडतोय

    संविधानाचा खून पडतोय

    सुप्रीम कोर्टानं राजकीय वापर थांबवा, असं म्हटलंय

     

  • 23 Feb 2022 04:13 PM (IST)

    केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपविरोधी सरकार असलेल्या ठिकाणी होतोय : छगन भुजबळ

    ईडीनं अटक केलेली असल्याचं ऐकलंय

    आता कायदेशीर लढाई सुरु होईल

    22 वर्षापूर्वी घेतलेल्या जमीनीवरुन ही अटक

    अटक करण्यासाठी काहीही कारणं शोधत आहेत

    केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपविरोधी सरकार असलेल्या ठिकाणी होत आहे

    अशा प्रकारच्या कारवायांमुळे भाजप विरोधात वातावरण तयार होईल

  • 23 Feb 2022 04:01 PM (IST)

    नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी कोर्टात

    नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी कोर्टात

    विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार

    नवाब मलिक यांचे वकील न्यायालयीन कोठडी साठी युक्तिवाद करण्याची शक्यता

    ईडीला प्राथमिक पुरावे द्यावे लागणार

  • 23 Feb 2022 03:53 PM (IST)

    नवाब मलिक चौकशीला सहकार्य करत नाहीत, सूत्रांची माहिती

    नवाब मलिक चौकशीला सहकार्य करत नसल्यानं अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.