ठाणे : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा कॉल आला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा महागात पडेल, असे या फोन कॉलमध्ये सांगण्यात आलेय. सातत्याने धकमीचे फोन कॉल्स येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराभोवतीदेखील आगावीचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
नवाब मलिक यांनी एनसाबीचे विभागीय संचालक यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर एक नवी माहिती समोर येत आहे. मलिक यांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येत आहेत. आज (22 ऑक्टोबर) सकाळी सात वाजता त्यांना धमकीचा फोन आला. नवाब मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने हा फोन कॉल उचलला होता.
नवाब मलिक यांना शुक्रवारी सकाळी राजस्थानहून एक निनावी फोन कॉल आला होता. या फोनकॉलामध्ये मलिक यांना धमकावण्यात आलं. समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा. अन्यथा महागात पडेल अशी धमकी या फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. याच कारणामुळे आता त्यांच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांची बहीण जाम्सिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असं मलिक यांनी म्हटलंय. तसेच समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार. वर्षभरात नोकरी जाईल. त्यांचा तुरुंगवास निश्चित आहे, असे आव्हानदेखील मलिक यांनी वानखेडे यांना दिले.
तर दुसरीकडे वानखेडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच देशसेवा करण्यासाठी तुरुंगात टाकले जात असेल तर मी स्वागत करतो. मला ते मान्य आहे, असेदेखील वानखेडे म्हणाले. विशेष म्हणजे माझ्या घरच्यांवर टीका केली जात आहे, हे चुकीचं असल्याचं मत वानखेडे यांनी व्यक्त केलंय.
इतर बातम्या :
आगीचे लोट दिसले अन् आम्ही धावतपळतच खाली आलो; अविघ्न पार्कच्या रहिवाश्यांनी सांगितली आँखो देखी!
गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय
Tips for Instant Glow : ‘हे’ घटक दह्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावा, फेशियलसारखी चमक येईल!https://t.co/btdcQirKX4 | #Skincaretips | #TipsforInstantGlow | #Beautytips #Skincare | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021