राज्यातील पाच मोठी शहरे नक्षलींच्या टार्गेटवर, मोठा प्लॅन उघड

| Updated on: Feb 05, 2024 | 7:47 AM

समाजात असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती मिळाले आहेत.

राज्यातील पाच मोठी शहरे नक्षलींच्या टार्गेटवर, मोठा प्लॅन उघड
Follow us on

गजानन उमाटे, नागपूर, दि. 5 फेब्रुवारी 2024 | राज्यात नक्षली चळवळ सक्रीय होत आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार घडवण्याचा प्लॅन नक्षलवाद्यांनी आखला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्यासाठी नक्षली सक्रीय झाले आहेत. शहरी नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आल्या आहेत, अशी माहिती नक्षली विरोधी अभियानाचे महासंचालक संदीप पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना दिली.

पाच शहरांमध्ये हिंसाचाराचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील पाच शहरांत शहरी नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन आहे. शहरी नक्षलवादी हिंसक आंदोलने करणार आहेत. हिंसक आंदोलन करुन सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

ही पाच शहरे रडारवर

नक्षलवाद्यांनी राज्यातील पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांचा वॅाच असणार असल्याचे महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’ संदीप पाटील यांनी सांगितले. समाजात असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

झोपडपट्टीतील मुले नक्षल चळवळीत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवादी काही शहरात हिंसक आंदोलने करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीपीआय मॅावोइस्ट या प्रतिबंध असलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट शहरांमध्ये हिंसक आंदोलने घडवणार आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून शासनाविरुद्ध रोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षल चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहे. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवलं होते. तसंच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत.