“अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारा, विरोधी पक्षात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा, जनतेच भलं व्हाव ही माझी भावना आहे. विकासाचा निर्णय घेणारा कार्यकर्ता आहे” असं अजित पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये जनसभेला संबोधित करत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दलही ते बोलले. “समाजात महिलांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजेत. मी अर्थसंकल्प सादर करताना तो विचार केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना मग, ते कुठल्याही जाती-धर्माच असू दे. त्या कुटुंबातील भगिनीला मदत मिळाली पाहिजे हा विचार केला” असं अजित पवार म्हणाले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे किती बोजा येईल, याचा अभ्यास केला. 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. गरीबाला सक्षम केलं पाहिजे. मोलमजुरी करणारी, कचरा वेचणारी, धुणी भांडी करणाऱ्या भगिनीला सक्षम केलं पाहिजे. जुलै महिना संपला, ऑगस्ट सुरु झालाय. ऑगस्टमध्ये सुद्धा ज्या महिला पात्र ठरतील, त्यांना रक्षा बंधनाच्या जवळपास ऑगस्टमध्ये 3 हजार रुपये थेट अकाऊंटमध्ये जमा होतील. ही रक्कम नवरा-मुलाच्या हातात नाही, थेट महिलांच्या खात्यात जमा होईल” असं अजित पवार म्हणाले.
‘हे औट घटकेच नाही’
“या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. विरोधक म्हणतात, हा चुनावी जुमला आहे. असं अजिबात नाहीय” असं अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांसदर्भात सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. मागचं कृषीपंपाच वीज बील माझ्यावर सोडा असं ते म्हणाले. महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिलीय. साडेसात हॉर्स पावर पर्यंत वीज बिल माफी. तुम्ही मागचं वीज बिल भरायचं नाही. कोणी विचारायला आलं, तर माझं नाव सांगा. शेतकरी म्हणतात दाद मागच वीज बिल, तुम्ही काळजी करु नका. त्यातून मार्ग काढू. हे औट घटकेच नाही, मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे. मी कधीही शब्द फिरवत नाही. दहावेळा विचार करुन शब्द देतो. एकदा शब्द दिला तर वाट्टेल ती किंमत मोजतो, मागे हटत नाही” असं अजित पवार म्हणाले.