अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय…? अजितदादा पक्षातील नेत्यावर संतापले

| Updated on: Sep 22, 2024 | 2:48 PM

कुत्रं गाडी खाली जाते, तसं त्याला वाटते तोच गाडी चालतो. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. परंतु अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौरा आला म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होता.

अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय...? अजितदादा पक्षातील नेत्यावर संतापले
ajit pawar
Follow us on

राज्यातील विधानसभा निवडणुकाचे वातावरण रंगू लागले आहे. निवडणुका जाहीर होण्यास आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकांमुळे युती अन् आघाड्यांमध्ये वाद रंगला आहे. परंतु सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद रंगला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली. तसेच अजित पवार यांचा दौरा रद्द केल्याचे वक्तव्य केले होते. त्यांना अजित पवार यांनी चांगलेच सुनावले आहे. अजित पवारांचा दौरा थांबवणारा अजून कुणी जन्मला नाही, असे अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटलावर नाव न घेता सडकून टीका केली.

काय म्हणाले अजित पवार

‘दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झाले. पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजित पवार यांनी मोहोळ येथे उमेश पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, कुत्रं गाडी खाली जाते, तसं त्याला वाटते तोच गाडी चालतो. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. परंतु अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौरा आला म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होता, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.

मी शब्दाचा पक्का…

मोहोळकरांना आगामी काळात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द देतो. मोहोळ आणि बारामती फार दूर नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर भागातील लोकांसाठी विकास कसा करता येईल, त्यासाठी करावे. काहीजण टीका करतात मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र आपण लोकांना फसवायचं नाही, लुबाडणूक करायची नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आजदेखील मी भाजप, शिवसेनेसोबत असलो तरी सेक्युलर विचारधारा सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराज, शाहू महाराज, महत्वा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसोबत आहे. महाराष्ट्रात काही लोक जाणून बुजून जातीय द्वेष पसरवत आहेत.

एका पक्षाचे सरकारचे दिवस गेले

1990 पासून कुणाचही एकाच पक्षाचे सरकार येत नाही. कुणाच ना कुणाचा पाठिंबा घ्यावा लागतो. आम्हाला 71 जागा मिळाल्या तेव्हाही बहुमत मिळाले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. आज जरांगे, हाके आरक्षणासाठी बसले आहेत. आम्ही सभागृहात आरक्षणासाठी एकमताने ठराव केला. कुणीही विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली. त्यांनी शपथ देऊन आरक्षण दिले, असे मराठा आरक्षणावर अजित पवार यांनी म्हटले.