Chhagan Bhujbal Shayari : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला. त्यातच आज नाशिकमध्ये त्यांनी समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार भाषण केले. त्यावेळी त्यांनी तीन शायरी म्हणत मनातील भावना मोकळ्या केल्या.
“मी निवडून येणं किंवा मंत्री बनणं ही माझी हाव नाही. मला मंत्रिपदाची हाव नाही. मी १६ नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १७ नोव्हेंबरला जालन्यात आलो. समीरला फोन येत होते. राजीनाम्याचा उल्लेख करू नका. एक व्यक्ती अर्वाच्च बोलला. म्हणून नगरच्या मिटिंगमध्ये मी राजीनाम्याचं बोललं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. अस्मितेचा आहे. एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. ज्यावेळी हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसणारच. मला मंत्रिपद न मिळाल्याने. पण तुम्ही दुखात राहू नका”, असे छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये केलेल्या भाषणात छगन भुजबळांनी तीन शायरी म्हटल्या. यावेळी त्यांनी शायरीच्या रुपाने मनातील खदखद बोलून दाखवली. “कभी डर ना लगा, मुझे फासला देखकर, मै बढता गया, रास्ता देखकर, खुदही खुद नजदीक आती गयी मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर”, अशी पहिली शायरी छगन भुजबळांनी म्हटली.
“मेरे बारें में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आयेगा, मेरा वक्त भी बदलेगा, और तेरी राय भी बदलेगी”, असेही छगन भुजबळ म्हणाले. “मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ”, असेही एक शायरी छगन भुजबळ म्हणाले.
“मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आहे. तुमच्यासोबत लढता लढता शेवटचा श्वास घेणार आहे. यात मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे तुमचे प्रश्न आहेत. तिथे आपण एकजुटीने राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहणार. तुम्ही हिंमत ठेवा. वाट पाहा. तोपर्यंत आपलं काम सुरू ठेवा. पुढे कदाचित आणखी काही संकटं येण्याचे नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा ओबीसी एल्गार करावा लागणार आहे”, असे छगन भुजबळांनी यावेळी म्हटले.