‘एकनाथ शिंदे शरद पवारांच्या संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा

| Updated on: Nov 04, 2024 | 7:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांनी आपल्याच सरकारमधील मुख्यमंत्र्यांबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या संपर्कात असून 23 तारखेला विधानसभेच्या निकालानंतर राज्यात काहीही घडू शकतं, असं भाकीत नवाब मलिक यांनी वर्तवलं आहे.

एकनाथ शिंदे शरद पवारांच्या संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर काहीही होऊ शकतं, नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा
नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा
Follow us on

विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झालेली बघायला मिळाली आहे. काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात दोन्ही बाजूला यश आलं असलं तरी पूर्ण बंड थोपवण्यात दोन्ही आघाड्यांना यश आलं नाही. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर विधानसभेच्या खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात आता पुढचे 15 दिवस प्रचाराची प्रचंड रणधुमाळी बघायला मिळणार आहे. अशा वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली होती. कित्येक वर्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे पक्ष मित्र बनले आणि मित्र पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. अशीच परिस्थिती 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण होईल, असा मोठा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांचा नेमका दावा काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्ष बदलू शकतात, असा धक्कादायक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी एका मुलाखतीत संबंधित वक्तव्य केलं आहे. निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेत येणार किंवा भाजपती पुन्हा सत्ता येणार असं म्हणणं कठीण आहे, असं नवाब मलिक म्हणाले. यावेळी त्यांना अजित पवार महायुतीत राहाणार की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं, असं म्हटलं.

हे सुद्धा वाचा

‘…तर मला तिकीट मिळालं नसंत’

यावेळी त्यांनी उघडपणे भूमिका स्पष्ट केली की, अणुशक्तीनगरमधून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपण अजित पवारांच्या सोबत आलो होतो. “मी राजकारणात नवा नाही. त्यामुळे मला माहिती आहे की, काय होऊ शकतं. मी महाविकास आघाडीत सहभागी झालो असतो तर मला अणुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळाली नसती”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिकांकडून अजित पवारांचं कौतुक

यावेळी नवाब मलिक यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. “मला वैयक्तिकरित्या अजित पवारांनी खूप मदत केली. मला तिकीट दिल्यानंतर त्यांच्यावर टीका होईल हे त्यांना माहिती असतानादेखील त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करु शकतात”, असं नवाब मलिक म्हणाले.