मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी देशात तब्बल अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले. यानिमित्ताने काही लोकांनी या मोहिमेचे कौतुक केले. तर यापुढेही असेच विक्रमी लसीकरण व्हावे अशी इच्छा व्यक्त करत, मोदींच्या वाढदिवशीच अडीच कोटी लोकांना लस मिळाली. रोज का नाही ? असा अप्रत्यक्ष सवाल काही लोकांनी केला. याच पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा-वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले, असी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केली. तसेच आधीचे पंधरा ते वीस दिवस लसीकरण कमी करणे चुकीचे आहे, असेही मलिक म्हणाले. (ncp leader nawab malik criticize pm narendra modi birthday celebration and vaccination program)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. या दिवशी अडीच कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. यावर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मोदींच्या वाढदीवशी विक्रमी लसीकरण करता यावे म्हणून आधीचे वीस दिवस लसीकरण कमी करण्यात आले. तसेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जर पावणेतीन कोटी लसीकरण झाले, तर आज आणि उद्या का नाही ? असा सवालही नवाब मलिक यांनी केला.
तसेच पुढे बोलताना हेच लसीकरण पहिल्यांदा केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता. मात्र एखाद्या व्यक्तीसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी भाजपच्या लसीकरण मोहिमेवर टीका केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पार्टीकडून मेगा कोरोना लसीकरण मोहीम चावलण्यात आली. या कार्यक्रमामुळे लसीकरणाचा नवा विक्रम तयार झाला. 17 सप्टेंबर रोजी 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. या दिवशी दुपारी अडीच वाजता सव्वा कोटी, साडे तीन वाजता 1 कोटी 60 लाखाच्या पुढे लसीकरण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. तसेच या दिवशी मेगा लसीकरणाचा कार्यक्रम देशभरात राबवला जाईल, असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं.
इतर बातम्या :
Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका
11.95 रुपयांच्या ‘या’ शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 3.09 लाख#businessnewsinmarathi #earnmoney #Multibaggerstock #Multibaggerstock2021 #StockOptions #stockreturn https://t.co/N6vM3ywGPN
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
(ncp leader nawab malik criticize pm narendra modi birthday celebration and vaccination program)