मुंबई : ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात मुंबईतील धारावी येथे विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) भडकाऊ व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, असा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊचे तसे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी खोचक भाष्य केलं आहे. ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला भडकाऊ भाईजान म्हणत त्याची अटक आणि सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केले आहे. याआधीही ठोंबरे यांनी प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.
हिंदुस्थानी भाऊ याला मुंबई पोलिसांनी अटक करुन कोर्टासमोर हजर केलं आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या निर्णयानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी हिंदुस्थानी भाऊच्या अटकेचे समर्थन केले आहे. तर काही लोकांनी विरोध केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केलेय. धक्का बुक्की नही करणेका. रुको जरा थोडा कोठडीत. भडकाऊभाईजान, असे ट्विट ठोंबरे यांनी केले आहे.
धक्का बुक्की नही करणेका
टपाटप
टपाटप
टपाटपरुको जरा #कोठडीत#भडकाऊभाईजान
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) February 1, 2022
तर दुसरीकडे हिंदुस्थानी भाऊच्या अडचणी वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषण देऊन विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलं होतं. आता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 1 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी भाऊ याने ऑफलाईन परीक्षांना विरोध करत विद्यार्थ्यांना धारावी परिसरात जमण्याचे आवाहन केले होते. तसा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडीओनंतर मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर बातम्या :
अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली