नाशिक : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मोठ्या राजकीय व्यती या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. काही नेत्यांनी या घटनेचा निषेध केलाय तर काही नेत्यांनी ही घटना निंदणीय असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील लोकशाहीत अशा घटना घडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मनाविरुद्ध लिहल्यामुळे एखाद्यावर हल्ला करणे चुकीचे आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
“गिरिश कुबेर यांच्यावर शाईफेक करुन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चर्चा सुरु होती. कुबेर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक मिही वाचलेलं आहे. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. ते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. या मताला विरोध करणारे दुसरे घटक असू शकतात. या देशामध्ये आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने लिहिलं तर त्याच्यावर हल्ला करणं चुकीचं आहे. आम्ही या गोष्टीचा पुरस्कार करणार नाही. ही गोष्ट निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीय.
तसेच पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ते पुस्तक स्वत: वाचल्याचे सांगितले आहे. त्यानंतर या पुस्तकात काही आक्षेपार्ह आढळून आलं का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही. मी एवढ्या खोलात गेलो नाही. पण हे मत मान्य नसेल तर तुम्ही लिहू शकता. बोलू शकता. पण हल्ला केला जाऊ शकत नाही,” अस म्हणत त्यांनी कुबेर यांच्यावरील हल्ल्याची निंदा केली.
कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसात संपूर्ण राज्यात उमटत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. यातील काही नेत्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. तर पवरा, भडणवीस आणि राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी या घनटेचा निषेध व्यक्त करुन नाराजी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या :