Sharad Pawar : बाळासाहेबांच्या बहिणीच्या अंगात आलं… अंक सिद्धिविनायकाला ठेवला अन्… शरद पवार यांनी सांगितला अफलातून किस्सा

| Updated on: Jul 17, 2024 | 1:13 PM

शरद पवार यांचा आज पुणे पत्रकार संघात वार्तालाप सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्याशी झालेली भेट आणि काल मोदीबागेत सुनेत्रा पवार आल्या होत्या, त्या विषयावर पवार काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सध्या शरद पवार जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा त्यांनी यावेळेस सांगितला. काय म्हणाले शरद पवार ?

Sharad Pawar : बाळासाहेबांच्या बहिणीच्या अंगात आलं... अंक सिद्धिविनायकाला ठेवला अन्... शरद पवार यांनी सांगितला अफलातून किस्सा
शरद पवार यांनी सांगितला अफलातून किस्सा
Image Credit source:
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुणे पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय विषयांवर न बोलता जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आठवण सांगताना शरद पवार यांनी एक अफलातून किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे आणि मी ( शरद पवार) प्रत्येकाने पाच पाच हजार काढून २० हजार खर्च करून राजनीती नावाचं पत्रक काढलं, असं ते म्हणाले. त्या अंकाबद्दलचा एक किस्सा त्यांनी सर्वांना सांगितला.

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्याशी झालेली भेट आणि काल मोदीबागेत सुनेत्रा पवार आल्या होत्या, त्या विषयावर पवार काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सध्या शरद पवार जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं

माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. आम्ही इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येतो का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आलो याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले.

मी आणि माझ्या काही मित्रांनी एक पेपर काढला. त्याचं नाव होतं नेता. नंतर मी हे फिल्ड सोडलं आणि पक्षाचं काम सुरू केलं. नंतर मुंबईत काँग्रेसभवनमध्ये राहत होतो. त्यावेळी काही लोकांशी मैत्री झाली. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि व्हीके देसाई होते. आणखी एक मित्र होते. आम्हा चौघांचा ग्रुप होता.  वर्तमानपत्र काढू  असं त्यावेळी मला वाटलं. बाळासाहेब ठाकरे आणि मी प्रत्येकाने पाच पाच हजार काढून २० हजार खर्च करून राजनीती नावाचं पत्रक काढलं. टाइम्सच्या अंकासारखं आम्ही तो अंक काढला.

बाळासाहेबांच्या बहिणीच्या अंगात आलं..

त्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्यांची मांडणी केली. पहिला अंक काढला. बाळासाहेबांच्या भगिनी होत्या. त्यांच्या अंगात देवी यायची. बाळासाहेब म्हणाले पहिला अंक कुठं ठेवायचा हे बहिणीला विचारू. बहिणीच्या अंगात आलं. ती म्हणाली, सिद्धिविनायकला अंक द्या. वाहिल्यानंतर तो अंक असा वाढेल की परत दिसणार नाही. त्यानंतर आम्हाला अंक दिसला नाही. त्यानंतर मी कानाला खडा लावला. धंद्यात भाग घेतला नाही. धाकटा भाऊ मात्र त्यात उतरला, असा किस्सा त्यांनी सांगितला.