पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आज कोल्हे त्यांच्या शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार होता. दरम्यान कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. (ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors)
सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यातदेखील वाढ झाली आहे. आज खासदार अमोल कोल्हे त्यांच्या शिरुरच्या दौऱ्यावर होते. यापूर्वी मागील दोन दिवसांपासून कोल्हे यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. त्यानंतर चाचणी केल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
इतर बातम्या :
चिमुकल्याचा गळा दाबून खून, मृतदेह पुरला, मूल नसल्याच्या नैराश्यातून हत्येचा संशय
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!
अशोकराव, आम्ही सुद्धा 96 टक्केवाले, नांदेडमधील गैरहजेरीवरुन संभाजीराजेंचा हल्लाबोल
(ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors)