‘आम्ही भाजपच्या शब्दांवर राहू, थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज’, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य

| Updated on: Jun 09, 2024 | 5:40 PM

"आम्हीदेखील त्यांच्या शब्दावर, आम्ही थोडे दिवस धीर ठेवू. आज एकमेकांची सर्वांना गरज आहे. महाराष्ट्रात उद्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीत आम्हा सर्वांना सामोरं जायचं आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की, काही ना काही योग्य निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येईल", असं महत्त्वाचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

आम्ही भाजपच्या शब्दांवर राहू, थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य
नरेंद्र मोदी, प्रफुल्ल पटेल
Image Credit source: ANI
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासह मोदींच्या नव्या कॅबिनेटचे अनेक मंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण मोदींच्या कॅबिनेटमध्ये अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला संधी देण्यात आलेली नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. केंद्राकडून अजित पवार गटाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी एक जागा अजित पवार गटाला ऑफर करण्यात आली होती. पण अजित पवार गटाने ती नाकारली. अजित पवार गटाला कॅबिमेन मंत्रिपद हवं होतं. पण ते महायुतीच्या निकषात न बसल्यामुळे त्यांना सध्याच्या घडीला संधी देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता प्रफुल्ल पटेल यांदेखील प्रतिक्रिया दिलीय.

“आमच्या पक्षाला डावलण्याचं किंवा कमी लेखण्याचं काही कारण नाही. खासदारांची संख्या घटली किंवा वाढली असा कुठलाही विषय नाही. शिवसेना आणि आमच्या संख्याबळात खूप अंतर आहे. दोन्ही पक्षाला एकच ऑफर केली. याचा अर्थ हे पण समजू नका की, त्यांच्या मनात काही भेदभाव आहे. त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं आहे. हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या, असं ते म्हणाले नाहीत. त्यामुळे आम्हीदेखील त्यांच्या शब्दावर, आम्ही थोडे दिवस धीर ठेवू. आज एकमेकांची सर्वांना गरज आहे. महाराष्ट्रात उद्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीत आम्हा सर्वांना सामोरं जायचं आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की, काही ना काही योग्य निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येईल”, असं महत्त्वाचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

प्रफुल्ल पटेल नेमकं काय-काय म्हणाले?

“आम्हाला भाजप पक्षश्रेष्ठींकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी पूर्वी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेलो आहे. म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्यात भाजप पक्षश्रेष्ठींची काही चूक आहे, किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत. कारण कसं आहे की, त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करायचं असतं. आता महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्यांना ज्या पद्धतीने सूचना मिळाल्या त्याच हिशोबाने आम्हालाही सूचना देण्यात आल्या आहेत. आता आम्हाला हेही सांगण्यात आलं क, तुम्ही थोडा धीर धरा. थोडे दिवस तुम्ही वाट बघा”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

“मी महाराष्ट्रबद्दल बोलू शकतो, भाजप पक्षाकडून जो निरोप आला त्याबद्दल बोलू शकतो. त्यांनी काही दुसऱ्या राज्यामध्ये दुसरा निकष लावला आहे किंवा इतर राज्यांमध्ये कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे हे मी त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच म्हणेल, त्यांनी महाराष्ट्रात जो निर्णय घेतला आहे, शिवसेना आणि आम्हाला तुल्यबळ समजूनच निर्णय घेतला असावा. पण हेही खरं आहे की, आम्ही त्यांना सूचना केली आहे. आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही म्हणून एवढंही सांगितलं गेलं की, थोडं तुम्ही धीर ठेवा. काही दिवस थांबा. याचा अर्थ असा नाही की, त्यांनी आम्हाला नाकारलेलं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

“माझ्यात आणि सुनील तटकरे असं काही नाही. माझ्या नावाचा निर्णय हा पक्षात एकमताने घेण्यात आला होता. केंद्राची जेव्हा संधी येईल तेव्हा ती प्रफुल्ल पटेल यांना द्यावी, असा आमच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्यात आलाय. हा कुठलाही वादाचा विषय नाही”, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

“काही दिवसांनी नक्कीच विचार होणार असल्याने आम्हाला भाजपकडून सूचना देण्यात आली असेल. पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चा झाल्याशिवाय आम्हाला सूचना देण्यात आली असावी. काही लोक प्रश्न निर्माण करत आहेत हे मी समजू शकतो. पण आम्हाला नाकारलं किंवा देण्याची इच्छा नाही, असं तर नाही ना? असं राहिलं असतं तर तुम्ही जे प्रश्न विचारलं असतं ते तर ते खरं असतं. आम्हाला त्यांनी काही द्यायचं कबुल केल्यानंतर आमच्याकडून काही वेगळी सूचना गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही दिवस थांबायला लावलंय”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.