सरकार दहीहंडीत बिझी, इकडे वेदांता प्रकल्प निसटला, अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

| Updated on: Sep 16, 2022 | 4:37 PM

सरकारने अजूनही प्रयत्न करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा. दुसऱ्या काही प्रकल्पाचं गाजर राज्यातील जनतेला दाखवू नये. अन्यथा या सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

अमरावतीः अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज शिंदे (CM Eknath Shinde) सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. सरकारने दहीहंडीसारखे (Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले. जसे काही यापूर्वी ते कधी साजरे झालेच नाहीत, असा आविर्भाव त्यांचा होता. मात्र ते उत्सव साजरे करत असतानाच इकडे एक लाख लोकांना नोकऱ्या देणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) हातातून निसटला, असा आरोप अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कऱण्यात आला. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारविरोधात आज शहरात निषेधात्मक दहीहंडी साजरी करण्यात आली.

सरकारने अजूनही प्रयत्न करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा. दुसऱ्या काही प्रकल्पाचं गाजर राज्यातील जनतेला दाखवू नये. अन्यथा या सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Published on: Sep 16, 2022 04:36 PM