Ajit Pawar Deputy CM Maharashtra | पक्ष, चिन्हासह अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील पाच महत्वाचे मुद्दे

| Updated on: Jul 02, 2023 | 4:31 PM

Ajit Pawar Deputy CM Maharashtra | छगन भुजबळ, दिलीप वळेस पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते आहेत. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

Ajit Pawar Deputy CM Maharashtra | पक्ष, चिन्हासह अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील पाच महत्वाचे मुद्दे
Deputy cm Ajit Pawar
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. त्यांनी आज थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. यात छगन भुजबळ, दिलीप वळेस पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते आहेत. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अजित पवारांसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथविधीनंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शरद पवारांच नाव घेतलं नाही. पण खूप महत्वाची विधान केली. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी होईल? ते स्पष्ट झालं.

– राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं अजित पवार म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार यांनी सांगितलं.

– विरोधी पक्षातला एक नेता मला दाखवा जो देशाचा विचार करतोय. प्रत्येकजण आपआपल्या राज्यापुरता विचार करतोय. राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीत एकत्र लढणार. जिल्हा पातळीवर स्थानिक निवडणुकीत जिल्हास्तरीय नेते निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.

– आमच्याबरोबर सगळे आमदार आहेत. काळजी करु नका. पक्ष आमच्यासोबत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. ही आजपर्यंतची परंपरा आहे. 24 वर्षात बरच पाणी वाहून गेलय. नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

– विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर लढवणार आहोत. आम्हाला सगळ्यांचा आशिर्वाद आहे असं महत्वाच विधान अजित पवार यांनी केलय. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून शरद पवार यांना आव्हान दिलं आहे.

– नागालँडला निवडणुका झाल्या होत्या. तिथे पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. सातही जणांनी त्याबाबतीत निर्णय घेतला आणि तिथे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये जाऊ शकतो मग महाराष्ट्रात विकासासाठी का नाही जाऊ शकतं? सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्हाला प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्या अनुभवाचा कशाप्रकारे चांगला फायदा देता येईल, मु्ख्यमंत्र्यांकडून आम्हाला खाती मिळतील. आम्ही सर्वस्व पणाला लावणार आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करु. असं अजित पवार म्हणाले.