चांगला पाहुणचार झाला, सुकट बोंबील, सुरमई बांगडा…अजितदादा कार्यकर्त्यांना काय म्हणाले..

| Updated on: Feb 18, 2024 | 12:53 PM

Ajit pawar | तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करतात. आता तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सगळे एकत्र येऊन तुम्ही तुमचे होम ग्राउंड सांभाळण्याचे काम करा. लोकांमध्ये नाराजी होईल. अशा कुठल्याही प्रकारचे काम करु नये.

चांगला पाहुणचार झाला, सुकट बोंबील, सुरमई बांगडा...अजितदादा कार्यकर्त्यांना काय म्हणाले..
Follow us on

सुनील जाधव, रायगड, दि. 18 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी पहाटेच रायगड पोहचले. त्यांनी रायगडमधील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची सकाळीच शाळा भरवली. निवडणुकीचा काळ आहे. राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातून पुन्हा एकदा उभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायची आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपले स्लोगन असणार आहे. सगळ्यांनी चांगला पाहुणचार केला. सुकट बोंबील, सुरमई बांगडाची चव चांगली आहे. येथील लोकही चांगले आहेत, असेच खेळीमेळीच्या वातावरणात राहून सगळ्यांना विश्वासात घ्या. सर्वांनी एकत्र काम करा, असा नेतृत्वपणाचा सल्ला अजित पवार यांनी केला.

काय म्हणाले अजित पवार

आपण महायुतीत गेलेलो आहे. उद्याच्या लोकसभेसाठी एनडीए माध्यमातून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व इतर सहकारी आपल्या सोबत असतील. महायुतीचा जो अधिकृत उमेदवार असेल, त्याला प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची आहे. देशाचं नेतृत्व करण्याची संधी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायची आहे. त्यासाठी जेवढे खासदार निवडून जातील तेवढी त्यांना मदत होणार आहे.

सरकारमध्ये राहून प्रश्न सुटतात

काम करत असताना नुसता विरोधी पक्षात राहून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सरकारमध्ये असलो तर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. मार्ग काढून निधी देता येतो. विकास काम करता येते. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे आहेत. मंत्रालयात असताना आदिती तटकरी आमच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करत असते. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक येणार आहे. नवीन रोजगार निर्माण होणार आहे. नमो रोजगार मेळावा लवकरच घेणार आहे. त्यासाठी सहा मोठे मिळावे घेणार आहेत. यामध्ये मोठे कंपन्या भाग घेतील.

हे सुद्धा वाचा

देशाच्या पातळीवर मोदी साहेबांसारखा दुसरा नेता कुठेही पाहायला मिळाला नाही. विरोधक अक्षरशः सैरावैरासारखे इकडे तिकडे पळत आहे. मधल्या काळात अनेक जण काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. बाबा सिद्दिकी आणि आत्ताचे विद्यमान आमदार यांचे वडील अशोक चव्हाण आले. आता कमलनाथ यांचे चिरंजीव ही काँग्रेस सोडत आहेत.

गाफील राहू नका. कोणी काही व्यक्तव्य केले तर…

तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करतात. आता तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सगळे एकत्र येऊन तुम्ही तुमचे होम ग्राउंड सांभाळण्याचे काम करा. लोकांमध्ये नाराजी होईल. अशा कुठल्याही प्रकारचे काम करु नये. मागच्या पाच वर्षांत आपण जिथे यश मिळत होतो, त्या ठिकाणी जास्त मतांनी आपण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा काढायची आहे. आपण सर्व उमेदवार आहे, असे विचार करून काम करा. आपसातला वाद करू नका. आपल्या कुटुंब परिवार आहेत, त्या पद्धतीने काम करा. गाफील राहू नका. कोणी काही व्यक्तव्य केले तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे नोंद घेतील. तुम्ही तुमच्या भावना दुखून घेऊ नका.