Breaking News : नितेश राणेंना जामीन मंजूर, राणे कुटुंबियांना मोठा दिलासा, आता आजारातून बरं होण्याचं आव्हान

| Updated on: Feb 09, 2022 | 3:47 PM

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणेंची तब्येतही खालवली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं. अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला गेलाय.

Breaking News : नितेश राणेंना जामीन मंजूर, राणे कुटुंबियांना मोठा दिलासा, आता आजारातून बरं होण्याचं आव्हान
Follow us on

सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि आमदार नितेश (Nitesh Rane Got bail) राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणेंची (Nitesh Rane Health) तब्येतही खालवली आहे. आज सकाळी तर त्यांना उलट्याचा त्रास होत असल्याचीही माहिती आली होती. त्यापार्श्वभूमीवर नितेश राणेंसाठी आणि एकूणच राणे कुटुंबियांसाठी (Narayan Rane) हा मोठा दिलासा मानला जातोय. नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं. अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला गेलाय. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये असेही कोर्टाने ठणकावले आहे.

जामीनासाठी घातलेल्या अटी पुढील प्रमाणे

1) 30 हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आलीय.
2) दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेशबंदी.
3) तपास आधिकारी तपासाला बोलवतील त्यावेळी चौकशीसाठी हजर राहणे.
4) कणकवली तालुक्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करणार त्या ठिकाणचा पत्ता देणे.
5) दर सोमवारी 10 ते 12 या वेळेत ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे.

विजय सत्याचाच-भाजप

नितेश राणे यांना जामीन मजूर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसनेवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. राज्य सरकारने दडपशाही करत नितेश राणे यांना अटक केली. मात्र शेवटी विजय सत्याचाच झाला अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून आता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यातलं राजकारण ढवळून निघताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि राणेंचे वकील जामीनासाठी कोर्टाचे उंबरे झिजवत होते. नितेश राणे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप आहे. सुपारीसारख्या आरोपात प्रत्यक्ष पुरावे नसतात हेच लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन दिला असल्याचे वकीलांनी सांगितलं आहे.

पाचव्या वेळेला नितेश राणेंना दिलासा

अटकपूर्व जामीनासाठी सुरूवातीला नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र सत्र न्यायालयाने जामीन फेटाळत त्यांना पहिला दणका दिला. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथेही राणेंची निराशा झाली आणि हायकोर्टानेही जामीन फेटाळला. त्यानंतर राणेंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाने राणेंना सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. शेवटचा पर्याय म्हणून नितेश राणे न्यायालयात हजर झाले.  त्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. आणि आता त्यांची तब्येत खालावली. हे सर्व लक्षात घेऊन कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Nagpur BJP | काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते सज्ज, नागपुरात एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Aurangabad politics | उद्यानातील खासदार-आमदारांच्या पाट्या हटणार, मनपा प्रशासकांचे भाजपला आश्वासन

VIDEO-PHOTO: अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर बाटलीभर शाई फेक, जीवाच्या आकंताने पळाले तरीही महिलांनी घेरलं