नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच, राज्याचं राजकारण तापलं

| Updated on: Sep 13, 2024 | 2:50 AM

अशा जिल्ह्यात बदली करणार की बायकोचाही फोन लागणार नाही. पोलिसांना बदलीची धमकी देतात, तुम्ही गृहमंत्री असून ऐकून घेतात आमदार नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. दरम्यान नवी मुंबईत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच, राज्याचं राजकारण तापलं
Follow us on

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या, असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चागलंच राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलं आहे.

सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी शपथ घ्या. जातीवादी आमदाराला देशातून हद्दपार करावं, राणेला कोणी तुकडा टाकत नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. कोणीही दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करु नये असं मत उदय सामंतांनी व्यक्त केलं. तसंच कोणी चुकत असेल तर शिक्षा झालीच पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला.

धर्माधर्मात भिंती उभी करण्याचं काम करु नये, चुकलं तर शिक्षा व्हावी कुठलाही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. रामगिरी महाराजांवरुन सुरु झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती.

रामगिरी महाराजांविरोधात मस्ती केली तर मशिदीत येऊन मारणार मशिदीत घुसून मारण्याची भाषा, बदला डॅनी जेवढा आहे तेवढंच बोल. सांगलीत देखील लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतरही वादंग निर्माण झालं होतं.