nitin gadkari speech: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख काम करणारा आणि काम करवून घेणार नेता म्हणून आहे. त्यांच्या कामांचे कौतूक सत्ताधारी पक्षातील लोकच नाही तर विरोधकसुद्धा करतात. आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. ते पक्षातील ज्येष्ठांना जाहीरपणे चार गोष्टी सुनावतात. नितीन गडकरी यांनी राज्यात मंत्री असतानाचा किस्सा सांगितला. मेळघाटमध्ये रस्ते कसे तयार झाले? त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या द्याव्या लागल्याचे नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
नागपुरात अरुण बोंबीलवार फाउंडेशन च्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी खास आपल्या शैलीत किस्सा सांगताना म्हटले, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मेळघाटमध्ये वन विभागाचे अधिकारी रस्ते बांधण्यास परवानगी देत नव्हते. तेव्हा त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणालो, मी चुकून राजकारणात आलो आहे. मी युवा असताना नक्षलाईट मोमेंटमध्ये गेलो होतो. आता जर पुन्हा गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मी काय, काय केले, ते सांगू शकत नाही. या शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना तंबी दिल्यानंतर मेळघाटचे रस्ते झाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या खास शैलीतून अधिकाऱ्यांपासून काम करून घेण्यासाठी त्यांची वेगळी ओळख आहे. मेळघाटमध्ये रस्ते होत नसताना मनोहर जोशीच्या काळात त्यांनी कशा पद्धतीने रस्ते बांधून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा किस्सा गमतीदारपणे सांगितला. त्यानंतर संपूर्ण मेळघाटमध्ये रस्ते झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
सरकारमध्ये चांगले आणि वाईट काय हे व्याख्या सांगताना चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याचे नाव सरकार आहे. कारण सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली ती फाईल वर जात नाही असाही किस्सा त्यांनी बोलताना सांगितला.