ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे

| Updated on: Nov 15, 2021 | 4:48 PM

शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीच, असे रोखठोक मत गोखले यांनी व्यक्त करत शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. त्याच वक्तव्याचा पेडणेकर यांनी खास ठाकरी भाषेत समाचार घेतला.

ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे
विक्रम गोखले आणि किशोरी पेडणेकर.
Follow us on

मुंबईः अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीच. ते एकत्र यावे म्हणून माझे प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी समाचार घेतला. ते मानानं, सन्मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही. गोखले बुद्धिजीवी आहेत असे म्हणत त्यांच्यावर शेलक्या भाषेत ताशेरे ओढले. ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचे जे गणित आहे ते चुकलेले आहे. हे सुधारायचे असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीच, असे रोखठोक मत गोखले यांनी व्यक्त करत शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. त्याच वक्तव्याचा पेडणेकर यांनी खास ठाकरी भाषेत समाचार घेतला.

हे त्यांना घाबरून नाही बरं…

पेडणेकर यांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सुरुवातीला बोलणे टाळले. त्या म्हणाल्या, अनेक बुद्धिजीवी आहेत. ते जसे म्हणतात ना नो कमेंट. तसंच माझंही म्हणणं आहे. हे म्हणणं त्यांना घाबरून नाही. मात्र, काय प्रतिक्रिया देणार. ते मानाने आणि सन्मानाने मोठे आहेत. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, अशा बुद्धिजीवींनी कुठंही बोलावे, असं चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, मुंडे अशा अनेक नेत्यांनी आमच्या पक्षासोबत छान काम केलं. आमच्या कामाचा इम्पॅक्ट देशात, मुंबईत दिसला. मात्र, आता कोणीही येणार आणि सूचवणार, असं होणार नाही, असं म्हणत त्यांनी गोखले यांनी केलेल्या शिवसेना-भाजप युती भाष्यावर ताशेरे ओढले.

प्रतिक्रिया देणंही टाळलं…

‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या वक्तव्याचे अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले होते. कंगना खरं बोलली. मी तिच्या विधानाचं समर्थन करतो, असे गोखले म्हणाले होते. यावर शरद पवारांना निफाडमध्ये प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले, अशी माणसं समाजात असतात, असं म्हणत त्यांनी एका वाक्यात गोखलेंचा निकाल लावत, त्या विषयावर प्रतिक्रिया देणंही टाळलं.

इतर बातम्याः

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

शेतकऱ्यांसाठी विशेष टास्क फोर्स, 1 हजार प्रकल्पांना देणार मान्यता, कृषिमंत्री भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा; असा होणार फायदा