अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीये. याबाबत बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्याशी चार दिवसापूर्वी माझी भेट झाली होती. त्यातही आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यांनी त्यात हैदराबाद गॅजेटचा उल्लेख, मुंबई प्रांत दस्तावेज, इंग्रजांचे गॅझेटचा हवाला दिला आहे. यात काय नेमकं होतं यावर चर्चा झालीये, दोन्ही समाजामध्ये समन्वय ठेवता येईल का या उद्देशाने मी मनोज जरांगे यांची भेट घेतलीये. मराठा आरक्षण देताना ओबीसींवर कुठेही अन्याय होऊ द्यायचं नाही ही आमची भूमिका आहे. इडब्ल्यूएसचा मोठा विषय आहे. त्याबाबत आत्ता आंदोलन सुरू झालंय, आमच्याकडे सात दिवयांपासून उपोषण सुरू आहे. जरांगेंसमोर लाखोंचा जनसमुदाय, मराठा बांधव ९ तास त्यांची वाट पाहत बसतात. याचे परिणाम होतील, राज्याच्या तिन्ही नेत्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करावी. जरांगे यांचे कार्यकर्ते ऊत्साही आहेत. आमदार राऊत यांनी त्यांची बाजू समजून ध्यायला हवी.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांना विश्वासात घेऊनच काम करतात त्यामुळे समन्वयाचा अभाव आहे असे वाटत नाही. ज्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती त्याच नावाने प्रचार प्रसार व्हायला हवा. तिघांमध्ये समन्वय आहे मात्र खाली समन्वयाचा अभाव आहे आणि खाली समन्वय राहावा यासाठी त्यांनी एकमेकांशी बोलून चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे. आम्हाला १०० जागा द्यायला पाहिजेत. ८० जागा एकनाथ शिंदे निवडूण आणतील. अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. चिंता एवढीच की खालच्या लेवलवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हायला हवं.
दरम्यान आज बीडमध्ये असताना मनोज जरांगे यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘288 मतदारसंघात आपण घोगंडी बैठक घेणार आहेत. इथे बैठका पण आणि सभा होत आहेत. घोगंडी बैठकिला पण ग्राउंड लागत आहे. आता ही आरपराची लढाई आहे. किती ही आडवे येऊ द्या आता थांबत नाही. फडणवीस यांनी नवीन नवीन आमदार उभे केले. फडणवीस यांच्या माध्यमातून यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे. फडणवीस साहेब मराठे आता तुम्हाला लोळवल्या शिवाय राहणार नाहीत. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर तुमचे 113 घरी गेले म्हणून समजा. गोर गरीब मराठ्यानी जागं व्हावं, मार खायची वेळ आली तर खा, केस झाली तर हो उद्या. पण मागे हटू नका. सगळे फडणवीस यांच्या हातात आहे. चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटन बंद पडले आहेत. बीडची तऱ्हा न्यारी आहे. बीडने राईट पाडा पाडी केली.
आदी जात किंवा जनता नंतर पक्ष, 15 एक वर्ष तरी यांना विधानसभा पुढे ढकल्याव्य लागणार आहेत.’