वीज कुठे कोसळणार हे आता चटकण समजणार, ISRO च्या या अनोख्या उपग्रहाची कमाल

| Updated on: Apr 02, 2025 | 3:04 PM

देशात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होतात, त्यामुळे इस्रोच्या या उपग्रहामुळे जर वीज कोसळण्याचा अंदाज कळाला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

वीज कुठे कोसळणार हे आता चटकण समजणार, ISRO च्या या अनोख्या  उपग्रहाची कमाल
Lightning Prediction By ISRO
Follow us on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने एक आणखीन एक चमत्कार केला आहे.इस्रोने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इस्रोने आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यात महत्वाचे यश मिळविले आहे. आता इनसॅट -3 डी उपग्रहाकडून मिळणाऱ्या डाटा मार्फत सुमारे 2.5 तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापासून दूरवर सुरक्षित जागेवर जाता येणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या विभागातील ही एक क्रांती मानली जात आहे.

आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशनमध्ये ( OLR ) इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र NRSC च्या संशोधकांनी इनसॅट – 3 डी उपग्रहाद्वारे मिळालेल्या ‘आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशन’OLR डाटामध्ये विशिष्ट संकेत पाहीले. त्यांना आढळले की OLR च्या तीव्रतेमध्ये त्यांना आढळले की ( OLR ) तीव्रतेत घट झाल्यामुळे वीज पडण्याची शक्यता असते. या निष्कर्षांवर आधारित, संशोधकांनी जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान (LST) आणि वाऱ्याचा वेग यासारखे अतिरिक्त मापदंड समाविष्ट केले. आणि एक संयुक्त मानक विकसित केले आहे. ते विजेच्या हालचालींमधील बदल प्रभावीपणे टिपते आणि अंदाज वर्तविते.

2.5 तासांआधी अंदाज वर्तवता येणार

या नव्या सिस्टममुळे वीज कोसळण्याचा अंदाज सुमारे 2.5 तास आधी कळणार आहे. यामुळे भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्रात वीज कोसळण्याची शक्यता ही फार मोठी हानी असते. कारण देशात सर्वाधिक 27 टक्के मृत्यू वीज कोसळून भाजल्याने होतात. त्यामुळे जर वेळीत अलर्ट मिळाला तर शेतकरी आणि गावकऱ्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहचता येणार आहे.ज्यामुळे जिवीत आणि वित्तहानी टळणार आहे.

हे सुद्धा वाचा

इस्रोच्या या संशोधनाने अंतराळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन नैसर्गिक संकटांचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा करता येणार आहे. हा प्रणालीमुळे भारतातच नाही तर आकाशातून वीज कोसळण्याच्या क्षेत्रातील लोकांना याचा फायदा होणार आहे.अन्य देशातील आपत्ती व्यवस्थापना यंत्रणेत बदल करु शकणार आहेत.