नवी दिल्ली : Obc आरक्षणाच्या याचिकेवर होणारी सुनावणी उद्यावर गेली आहे, ही सुनावणी आता उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. उद्याची सुनावणी ओबीसी आरक्षणाच्या दुष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो अध्यादेश काढला होता. तो सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत.
मध्य प्रदेशची केसही आपल्यासारखीच
मध्य प्रदेशची केसदेखील काहीशी आपल्या सारखीच आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता OBC प्रकरणावर सुनावणी होईल. अशी माहिती छनगन भुजबळ यांनी दिली आहे. मध्य प्रदेशसाठी तुषार मेहता केस लढत आहेत. इतर राज्यामध्ये देखील आपल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. इंपेरिकल डेटावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
मागच्या सुनावणीवेळी काय झालं?
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्यामुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असं आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नाही, असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत, असं निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळल्याचंही दिसून आले. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होतंय याकडे राज्य शासनासह, संबंध ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.