मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव वाढत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. सोमवारी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्यानं काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, राज्यात आज 11 जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या आता 65 वर पोहोचली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर ओमिक्रॉनचा वाढता फैलाव आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे.
आज आढळून आलेल्या11 ओमिक्रान बाधितांमध्ये 8 जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळून आले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळलेल्या 65 ओमिक्रान बाधितांपैकी 34 जणांची आरटीपीसआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दुसरीकडे राज्यात आज 825 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 792 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 66 लाख 50 हजार 965 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 64 लाख 98 हजार 807 रुग्ण कोरोनामुक्त होऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाणे 97.71 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Maharashtra reports 825 new #COVID19 cases, 792 recoveries and 14 deaths in the last 24 hours.
11 more patients have been found to be infected by Omicron. Till date, a total of 65 patients infected with the #Omicron variant have been reported in the state. pic.twitter.com/uUPgDDOgYH
— ANI (@ANI) December 21, 2021
टास्क फोर्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येईल. अशावेळी ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन हा महत्वाचा उपाय असल्याचंही टास्क फोर्सने म्हटलंय.
देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठा इशारा दिला आहे. देशाने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असं डॉ. गुलेरिया म्हणाले. ब्रिटनमध्ये रविवारी एकाच दिवशी ओमिक्रॉनचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. याचं उदाहरण देत डॉ. गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. भारताने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. ओमिक्रॉन वेरियंटसंदर्भात आपल्याला अधिक माहितीची गरज आहे, असं ते म्हणाले.
इतर बातम्या :