उल्हासनगर : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीनं उल्हासनगर महापालिका (Ulhasnagar Municipal Corporation) अलर्ट झाली आहे. त्याच अनुषंगानं शहरात कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं, यासाठी महापालिकेनं यंत्रणा कामाला लावली आहे. उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं. वर्षाचे बाराही महिने उल्हासनगर शहर ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं. त्यामुळं कोरोनाचा फैलाव दुकानांमधून होऊ नये, यासाठी दुकानदार आणि कामगार यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक करण्यात आलंय.
ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असतील आणि मास्क घातला असेल, त्यांनाच दुकानात प्रवेश देण्याचा नियम उल्हासनगर महापालिकेनं लागू केलाय. या नियमांचं उल्लंघन झालं तर दुकानदाराला थेट 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. मास्क न वापरता रुमाल किंवा स्कार्फ बांधून फिरणाऱ्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी हे उल्हासनगरच्या अतिशय गजबजलेल्या गोल मैदान आणि गजानन मार्केट परिसरात धडक कारवाई केली जात आहे. त्यामुळं नागरिक आणि दुकानदार यांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.
ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी 213 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 असे 527 कोटींचा निधी मंजूर झाल्याने या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून त्यांनी या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच याठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी 314 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर याजागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त 213 कोटी रुपयांची गरज होती. आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रकमेला मान्यता मिळाली आहे.
इतर बातम्या :