कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचे 8 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला. तर, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात असे महाराष्ट्रात एकूण 8 रुग्ण आढळलेत. तर, राजस्थानमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. त्याच्यावर लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
टास्क फोर्स बैठकीत चर्चा
राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून घेतला ओमीक्रोन विषाणूच्या स्थितीचा आढावा
टास्क फोर्सची रात्री उशिरा पर्यँत दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डोक्टरांसोबत झाली बैठक
ऑनलाइन झालेल्या बैठकीत ओमीक्रॉंन किती घातक आहे , आणि त्याचे परिणाम काय आहेत या सगळ्या विषयावर झाली चर्चा
बैठकीत झिम्बाब्वे मध्ये वाढलेल्या विषानूवर देखील झाली चर्चा
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देखील ओमीक्रोनची लागण होतेय ,त्यामुळे बूस्टर डोस घेण्याविषयी देखील काही डॉक्टरांनी या बैठकीत सूर आळवल्याची माहिती
ओमीक्रोनमुळे टाळेबंदी ऐवजी नियमांचं कठोर पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याच तज्ञांचं मत
झालेल्या बैठकीचा एकूण आढावा मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर केला जाणार
टास्क फोर्सच्या बैठकीला सुरुवात
ओमीक्रोनचा धोका वाढत असल्यामुळे टास्क फोर्सची महत्वाची बैठक
बैठकीत टास्क फोर्स मधील प्रमुख डॉक्टर सहभागी झाले आहेत
या बैठकीत दक्षिण आफ्रिकेतील एक तज्ञ महिला डॉक्टर सहभागी झाल्या आहेत
ओमीक्रोन संदर्भातील अधिकची माहिती दक्षिण आफ्रिकेतील या तज्ञ महिला डॉक्टरकडून टास्क फोर्स मधील डॉक्टर जाणून घेणार आहेत
ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सुरू आहे
तसेच राज्यातील आणि देशातील ओमीक्रोनच्या शिरकावा नंतर सम्पूर्ण परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे
नाना पटोले बाईट
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न केले… सर्व पक्षीय बैठका घेतल्या… सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50% चे मर्यादेच्या आत ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेशही काढला… अध्यादेशाला राज्यपालांनी मान्यता ही दिली.. त्यानंतरच ओबीसी आरक्षणासह निवडणुका लागल्या होत्या…
मात्र, भाजपने 2017 पासून ओबीसी समाजाचा आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आता ते यशस्वी झाले…
मात्र महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले…
सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिले… त्यात हे तपासायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आधारावर राज्य सरकारचे अध्यादेश रद्द केले आहे…
ज्या पद्धतीने बीजेपी पाठीमागून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्यासाठी खेळ करत आहे ते आता समोर आलंय…
ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात कोण लोक गेले त्यांची आर्थिक परिस्थिती काय… त्यांनी मोठे मोठे वकील कसे लावले… त्या पाठीमागे कोण आहे या सर्व बाबींचा खुलासा झाला पाहिजे…
सर्वोच्च न्यायालय इंपेरीकल डेटा मागत आहे मात्र केंद्र सरकार देत नाहीये… जातीय जनगणना करायला केंद्र सरकार तयार नाहीये… या पद्धतीचा अडेलतट्टूपणा ओबीसी समाजा संदर्भात केंद्रातले भाजप नेते करत आहे… मात्र राज्यातील भाजपचे नेते आंदोलनाची भूमिका घेत आहे.. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे…
आमची राज्य सरकारला विनंती आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाला मदत करावी.. इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी त्यांना आवश्यक मदत करावी…
शिव सेना युपीए मध्ये दाखल होण्याच्या हालचाली वाढल्या हे चांगलं आहे देशाला विकणार्या सोबत राहणार की देशाचा विकास करणाऱ्या सोबत हे मी आधीच सांगितलं होतं त्या हालचाली सुरू झाल्या असेल आणि शिवसेना सोबत येत असेल तर हे चांगलं आहे
चंद्रकांत पाटील
हे काय चाललय, गोंधळी सरकार आहे का
फक्त ओबीसी जागा वगळून निवडणुका म्हणजे कपाळाला हात मारून घायचा का
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय गोंधळात गोंधळ निर्माण करणारा आह
एस टी कर्मचाऱ्यांना मे स्मा लावण्याचा विचार केबिनेट मध्ये झाला. हे हुकूमशाही सरकार आहे. आतापर्यंत 60 कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्या.
निवडणूक आयुक्तांनी हे आताच स्पष्ट करावं.
राजकीय पक्षांनी दोनदा निवडणुका करायच्या का?;
मेस्मा लावणे अमानवीय आहे। ही हिटलर शाही आहे।
पुणे
पुण्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णाच्या संपर्कातील 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह,
कुटुंबातील 13 सदस्यांची केली होती चाचणी, आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह,
महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एक चांगली बातमी
सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही
उस्मानाबाद जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 09 सक्रिय रुग्ण
आज 8 रुग्ण बरे झाल्याने जिल्हयात दिलासा
67 हजार 682 पैकी 65 हजार 596 रुग्ण बरे त्यामुळे 96.91 टक्के बरे होण्याचे प्रमाण
1 हजार 503 जणांचा मृत्यू त्यामुळे मृत्यू दर हा 2.22 टक्के
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांंचे सोमवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. ते ६५ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
अहमदनगर
माजी मंत्री गिरीश महाजन यांची राज्य सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी
एवढ्या चौकशा सूर आहे की भ्रष्टाचाराला लिमिटच राहील नाही
कायदा सुव्यवस्था कुठेच राहिली नसून राज्यात काय चालय याची कल्पना करू शकतात
तीन पक्षाचं सरकार मात्र कोनामध्येही एकमत नाही
अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही कारवाई नाही तर या सारकामध्ये निर्लज्जपणाचा कळस
बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नाही
गिरीश महाजन ऑन एसटी संप
आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनीरेकॉर्ड मोडले मात्र आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून समोर जायचो याचा मी साक्षीदार
मात्र या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही
तुम्ही मोर्चा काढा उपोषणाला बसा किंवा मरा मात्र या सरकारला कुठलेलंही सोयरसुतक नाही
एसटी मोर्चाला मंत्री जाऊन भेटीले असते तर हा प्रश तेव्हाच मिटला असता
प्रवाश्यांचे हाल होत असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही
पुणे
पुणे रेल्वे विभागात तिकीट तपासणी मोहिमेत नोव्हेंबर महिन्यात 30 हजार 976 फुकट्या प्रवाशांना पकडलं
फुकट्या प्रवाश्यांकडून एक कोटी 40 लाख रुपये दंड वसूल
पुणे रेल्वे विभागात रेल्वे विभागाकडून तिकीट तपासणी मोहीम सुरु
नोव्हेंबर या एका महिन्यात तब्बल 30 हजार 976 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले
त्यांच्याकडून एक कोटी 40 लाख 25 हजार रुपये दंड वसूल
बुकिंग केलेले नसतानाही रेल्वे स्थानकावरून पार्सल विभागातून सामान घेऊ जाणा-या 104 जणांकडून 18 हजार रुपये वसूल
पुणे
दिवसभरात 38 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 88 रुग्णांना डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 02 एकूण 02 मृत्यू
-84 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 507174
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 791
– एकूण मृत्यू -9105
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497278
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4426
नवी दिल्ली
चार जणांचे शिष्टमंडळ नागालँडला जाणार
काँग्रेस नागालँड हत्याकांडा बाबत अभ्यास करणार
एक आठवड्याच्या आत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करण्यात येणार
नागालँडच्या हत्याकांडाबाबत काँग्रेस शहानिशा करून सरकारला घेरण्याच्या तयारीत
नागालँडमध्ये बंडखोर समजून मजुरांवर करण्यात आला बेछूट गोळीबार
गोवा
पणजी – गोवा राज्यात ओमीक्रॉंनची एन्ट्री
ओमीक्रॉंनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ
रशिया मधून आलेला प्रवाशांचा ग्रुप कोरोना पॉझिटिव्ह
संशयित प्रवासी सध्या विलगीकरण कक्षात
ओमीक्रॉंनमुळे गोवा सरकारची चिंता वाढली
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम
सांगली
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक
तर उपाध्यक्षपदी जयश्रीताई मदन पाटील.
प्रथमच महिला संचालकांना संधी
पुणे
सुप्रीम कोर्टाने डेटा अभावी ओबीसी राजकीय आरक्षणास स्थगिती देताच ओबीसी घटकांमधून केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय..
स्वत:ला ओबीसींचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांनीच राजकीय राजकीय आरक्षणाचं वाटोळं केलं असून आतातरी सरकारने वेळेत डाटा द्यावा आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवावं, अशी मागणी व्हिजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केलीय
कल्याण
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती…
केडीएमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची संख्या 294..
88 नागरिकांची झाली कोरोना चाचणी..
34 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह..
48 रिपोर्ट प्रतीक्षेत…
34 लोक महापालिका क्षेत्राबाहेरील नागरिक..
109 लोकांचा शोध सुरू..
परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी SOP तयार..
परदेशातून आलेल्या नागरिकांना होम कोरोटाईन बंधनकारक..
7 दिवसानंतर पुन्हा होणार त्यांची कोरोना चाचणी..
चाचणी नंतर पुन्हा 7 दिवस कोरोटाईन बंधनकारक..
उद्यापासून पोलिसांसोबत महापालिका करणार मास्कवर धडक कारवाई..
बंदिस्त हॉल मध्ये 50 टक्केची मर्यादा बंधनकारक..
खुल्या मैदानात 25 टक्के मर्यादा बंधनकारक..
एपीएमसी मार्केट मध्ये गर्दी टाळण्यासाठी मार्केटच्या सचिवांना केल्या सूचना..
नायजेरियाहून आलेल्या एका कुटुंबातील चौघे महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये..
यांच्या संपर्कात आलेले 4 जण पॉझिटिव्ह..
कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या दुकानातील कर्मचारी, टॅक्सी चालक याची कोरोना चाचणी महापालिका करणार..
अमोल कोल्हे
सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्याचं म्हणणं ऐकून घेतली
दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला, सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत झालेली सुनावणी आणि महाराष्ट्रात पेटा या संस्थेनं केलेल्या कायद्याविषयी बाजू ऐकून घेतली,
आणि या दोन्हींसाठी सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर ही तारीख दिलीये,
येत्या 15 तारखेला सकारात्मक निर्णय होईल
आणि बैलगाडा मालकांना बैलगाडा प्रेमींना दिलासा मिळेल अशी आशा खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलीये..
अमोल कोल्हेंनी आजच्या सुनावणीवरती प्रतिक्रियेचा व्हीडीओ शेअर केलाय..
नाशिक
– नाशिकच्या द्वारका चौकात भीषण अपघात
– मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी चालकाला चिरडल
– दुचाकी चालक ट्रकच्या टायर खाली सापडल्याने जागीच मृत्यू
– ट्रक चालक पळून जात असताना जमावाने पकडून पोलिसांच्या केलं स्वाधीन.
नांदेड
एकाच कुटूंबातील मृतदेह जंगलात सापडले
आईसह मुलाची दगडाने ठेचून निघृण हत्या
वडीलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
तर त्याच कुटुंबातील 18 वर्षीय मुलगा बेपत्ता
हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा जंगलात सापडले मृतदेह
आठ दिवसांपुर्वी हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज
हिंगोली
35 दिवसांनंतर कळमनुरी अगरातल्या एका बसचे टायर फिरले
कळमनुरी अगरातून पहिली बस परभणी कडे रवाना
डेपो म्यानेजर मुक्तेश्वर जोशी यांची माहिती..
ह्या गाडीवर दगड फेक
अज्ञातांनी केली दगड फेक
कऱ्हाळे डिग्रस पाटी शिवारात केली दगडफेक..
घटनास्थळी हिंगोली ग्रामीण पोलीस रवाना
नवी दिल्ली
मेस्माचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होणार
एसटी कर्मचा-यांवर मेस्मा लागणार?
मेस्मासंदर्भात येणा-या कॅबिनेटमध्ये होणार चर्चा
संपकरी एस टी कर्मचाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत सरकार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांचा घेणार सल्ला
मेस्माच्या लावल्यानं काय परिणाम होऊ शकतात यांवर होणार चर्चा
नवी दिल्ली
महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांत OBC साठी आरक्षित जागांवर निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती. सरकारनं जारी केलेला अध्यादेशही सुप्रीम कोर्टाकडून स्थगित.
सर्वसाधारण, एससी आणि एसटी साठी राखीव असलेल्या जागांवरच्या निवडणुका घेता येणार असा निर्वाळा.
फेब्रुवारीत 23 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
महेश लांडगे बाईट
बैलगाडा शर्यत
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रात स्पर्धा बंद आहेत. आमचे मत ऐकून न घेता उच्च न्यायालयाने स्टे दिला. आता 15 तारखेला सुनावणी होईल. तीही महाराष्ट्र आणि गुजरात येथील बैलगाडा शर्यतीवर चर्चा होऊन आमच्या बाजूने निकाल लागेल.
आज खिलार बैलावर चर्चा झाली. त्यासंबंधी हा बैल धावू शकतो हा एक शास्रीय अहवाल न्यायालयाला दिला आहे.
२०११ पासून हे विषय सुरू आहे. ही स्पर्धा सुरू झाली नाही, तर खिलार गोवंशी नष्ट होईल.
किरीट सोमय्या
स्टॅंडींग कमिटी चेअरमन यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे वित्त मंत्रालयालयाला दिले.
स्कायलिंग लिमिटेड कंपनी कोलकाता मध्ये रजिस्टर्ड आहेत.. एका कंपनीकडून निखिल जाधव यांच्या कंपनीत पैसा आला… हा पैसा युएई त जाधव यांनी कंपनी बनवली त्यात गुंतवला आहे.
चार महिन्यापूर्वी तक्रार आली होती… ठाकरे सरकारने वसूली सरकारचा हा कारनामा उघड बाहेर पडतोय..
ईडीनं गैरव्यवहार शोधून काढावा…
ट्रान्जेक्शन सिद्ध झाले आहे.. आता जाधव कुटुंबाने पुढे येऊन सांगावे
शिवसेनेची नौटंकी सुरूय… ते इतर राज्यांत पण लढतात.. परंतु त्यांची सर्व ठिकाणी इज्जत जाते.
अजित दादा आपली बॅग कपडे भरून जाण्याची तयार करतायेत.
दादांच्या जवळचे चौकशीला समोर येत नाहीत.
नवी दिल्ली
खासदार विनायक राऊत
संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुरू असतात
संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची घेणार आहेत भेट
आम्ही UPA मध्ये गेलो नाही – विनायक राऊत
पण आम्ही NDA मध्ये पण नाही – राऊत
राऊत वरिष्ठ नेते, राष्ट्रीय पक्षांशी ते चर्चा करतात, त्यात वावग काही नाही
शिवसेना राष्ट्रीय पक्ष होतोय, भविष्यात सेना पदार्पण करेल
भाई जगताप पत्रकार परिषद
28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर येणार
सोनिया गांधी नाही आमंत्रण दिला आहे आणि विनंती केली आहे की त्यांनी शिवाजी पार्कच्या सभेत याव
बीडीडी शाळेतील ब्लास्ट झाला आहे मुलगा आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे ही घटना दुर्दैवी आहे याकडे प्रशासनाने फक्त सहानुभूतीपूर्वक बघू नये
याअगोदर आविघ्न आगीची घटना घडली आहे पण तिथल्या फायर ऑडिट रिपोर्ट सादर झाला नाही
बाबासाहेब आंबेडकर यांच इंदू मिल इथ त्यांच आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे काँग्रेसने ही जागा वर्ग केली होती पत प्रधान नरेंद्र मोदी यानी त्याचं भूमिपूजन केलं होतं 28 परवानग्या मिळूनही त्याचे बांधकाम पूर्ण होत नाही आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारकांच अरबी समुद्रत पूजन झाल आपण पुढे त्याचं कामकाज पुढे गेलेल नाही
केंद्र सरकारन यासंदर्भात कोणतही पुढाकार घेतलेला नाही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे तात्काळ होईल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं त्याचं काय झालं हे सगळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केल होत
मुंबई महानगरपालिकेचे 227 चे वॉर्ड 236 झाले आहेत
हे 236 वॉर्ड नवीन जनगणनेनुसार व्हावे आणि तांत्रिक दृष्ट्या व्हावे ही काँग्रेसची मागणी आहे
सांताक्रुज इथल्या विमानतळाच्या धावपट्टी च्या विकासासाठी घेण्यात आलाय त्यामुळे तिथल्या झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावी अशी मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे
नवी दिल्ली
खासदार नवनीत राणा वन-टू-वन
12 आणि 13 तारखेला जे काही घडलं ते मनाला न पटण्यासारखं घडलं
अमरावती मध्ये अनेक नेत्यांनी भडकाऊ भाषण केली
रझा अकादमीची चौकशी व्हावी
ही माझी केंद्राकडे मागणी
अमरावती हिंसाचार हा प्रि प्लॅन होता
महाराष्ट्र सरकार काय करत होतं खासदार राणा यांचा सवाल
नागालँडमध्ये जे झालं ते मन दुखावणार होतं मात्र अमरावती माझं क्षेत्र असल्याने मी तो मुद्दा उपस्थित केला
शिवसेनेचा मार्ग अजून निश्चित नाही – राणा यांचा शिवसेनेला UPA मध्ये सामील होण्याबाबतच्या निर्णयावर टोला
नवी दिल्ली
बैलगाडी शर्यतीबाबत आजही निर्णय नाही
15 डिसेंबरला होणार पुन्हा सुनावणी
आजही सुप्रीम कोर्टात कोणताच निर्णय नाही
भाई जगताप
राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावं. या देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. याचा मुकाबला स्वातंत्र्य पूर्वी काँग्रेसने केला आणि आता भाजप विरुध्द लढून करत आहे. आम्ही आरएसएसचा अजेंडा देशात राबवून देणार नाही.
युपीए मध्ये सेनेला घ्यायचे का हे मी ठरवू शकत नाही काँग्रेसचे नेते ठरवतील…
महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या जीवावरच आहे
– या देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घेतला जात आहे याचा मुकाबला काँग्रेस करत आली आहे..
– भाजप च्या RSS अजेंडाला काँग्रेसच रोखू शकते..
कंगना रणावत यांना पद्मभूषण मिळत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे..
बाळासाहेब यांना भारतरत्न द्यायला हवे ही तोगडिया यांची मागणी असेल मला माहित नाही..
एअरपोर्टवर रिस्क कंट्री मधील प्रवाशांचं टेस्टींग होतंय…
हेल्थ पोस्ट, वॉर्ड रुम यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी
रेल्वे स्टेशनवर स्क्रीनींग, रॅपीड टेस्ट केल्या जातायेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात अशा प्रकारचं कृत्य झालं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष आहेत महाराष्ट्रान देशाला दिलेले. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं. आपण कितीही तज्ज्ञ असलो तरी सावधानता बाळगली पाहिजे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये झालेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. संभाजी छत्रपती यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अभिनंदन करतो, असं संजय राऊत म्हणाले.
नागालँडच्या प्रकरणावर सरकारनं माफी मागितली आहे. कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात. आमच्या सारख्यांच्या मागे सरकारी यंत्रणांना लावत छळ केला जातो. गोळ्या घातल्या जात नाहीत इतकंच, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन हे बेकायदेशीर आहे. तीन महिन्यानंतर पुढच्या अधिवेशनात शिक्षा देणं हे कोणत्या नियमात बसतं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक सावरकरांबद्दल प्रेम आणि सद्भाव ठेवतो. शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये सावरकरांवर केलेलं पहिलं भाषण नाही. त्यांनी बारामतीतही विद्वतापूर्ण भाषण केलं होतं. भाजपला सावरकरांचा शौर्य का दिसत नाही. त्यांना ते भारतरत्न का देत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
वेगवेगळी संकट येत असतात. मात्र, त्या संकटावर मार्ग काढायचा असतो. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे. त्यानिमित्तानं काळजी घ्यावी लागेल. मुख्यमंत्री दरवर्षी उपस्थित राहतात. मात्र, त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळं ते उपस्थित राहू शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कोल्हापूर
गेल्या काही दिवसात परदेशातून आलेल्या प्रवाशांची आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या हाती
कोल्हापूर जिल्ह्यात आले 112 प्रवासी
तर कोल्हापूर सह सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 433 प्रवासी आल्याची माहिती
यातील 84 जणांची केली rt-pcr टेस्ट, सुदैवाने एकही पॉझिटिव्ह नाही
इतरांचाही शोध सुरू
रत्नागिरी- ओमिक्राॅनच्या पाश्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून 157 नागरिक आले
51 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, 20 जण आलेत दुबईतून
त्यापैकी 106 जणांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरु
106 जण सापडत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या अडचणी वाढल्या
सोलापूर– परदेशातून येणाऱ्या नागरिकावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर
ओमीक्रोन रुग्ण विदेशात तसेच भारतात सापडल्याने सर्वत्र बाळगली जात आहे सतर्कता
विदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी अद्याप गृह विभागाकडून प्राप्त नाही
त्यामुळे गृहविभाग तसेच विमान प्राधिकरण विभागाकडून यादी मिळाल्यानंतर संबंधित नागरिकांना दहा दिवसांचा होम क्वारंटाईन करण्यात येणार
– नागपूर जिल्हयात 13 टक्के लोकांनी घेतला नाही कोरोना लसीचा पहिला डोज
– जिल्ह्यातील 52 टक्के लोक अद्यापंही संपूर्ण लसीकरणापासून दूर
– तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही लसीकरणाबाबत अनेकजण उदासीन
– रामटेक तालुक्यात सर्वात कमी लसीकरण
– ओमिक्रॅानच्या पार्श्वभुमीवर १०० टक्के लसीकरण गरजेचं
– शारजावरुन नागपूरात आलेल्या १०० प्रवाशांचं गृहविलीगीकरण
– मनपातर्फे १०० प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी, तीन तासात रिपोर्ट
– सर्वांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यावर गृहविलीगीकरण
– ओमिक्रॅानच्या पार्श्वभुमिवर नागपूर महानगरपालिकेचा निर्णय
– सर्व १०० प्रवाशांवर मनपाच्या आरोग्य विभागाची असणार नजर
संपूर्ण देशभरात ओमिक्रोनचं संकट असतानाच आज NTAGI म्हणजेच नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये बूस्टर डोस आणि लहान मुलांना लस देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल तो पुढे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला जाणार आहे
पुणे महापालिकेची बंद असलेली कोव्हीड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची महापालिकेची तयारी,
मात्र परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनसाठी कोव्हीड सेंटरमध्ये राहायचं नसेल महापालिका करणार हॉटेलची सूविधा,
मात्र हॉटेलचा खर्च करावा लागणार प्रवाशाला,
दूसऱ्या लाटेतही महापालिकेनं अशी व्यवस्था केली होती,
सध्या नायडू हॉस्पिटल आणि बाणेर कोव्हीड सेंटर अशी दोनचं सेंटर सुरू आहेत..मात्र हडपसर , येरवड्यातील कोव्हीड सेंटर सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे…
ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं महापालिका अलर्ट मोडवर,
पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची केली पाहणी,
रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या दिल्या सूचना,
जम्बो रुग्णालय 1 जानेवारीपर्यंत न हलवण्याच्या सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या होत्या,
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भारती पवार यांनी काल पाहणी करून रुग्णालय रेडी पझेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्यात,
जम्बो रुग्णालयात एकुण 800 बेडची व्यवस्था आहे…