पुणे – ओमीक्रॉन व्हेरियंटचा धोका निर्माण झाल्यामुळे केंद्र शासनाबरोबरच स्थानिक प्रशासनही सर्तक झाले आहे. त्यामुळे पुण्यात यंदातरी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव भरणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओमीक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र इतक्या अल्प प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे संयोजन कसे करायचे असा प्रश्न आयोजकांना पडला आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासनाने किमान 50 टक्के प्रेक्षक वर्गाला परवानगी द्यावी. जात50 टक्के प्रेक्षक वर्गाच्या उपस्थितीला अनुमती मिळाली तरच सवाई महोत्सवाच्या आयोजनाचा विचार करता येईल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
अजित पवारांची भेट घेणार
आयोजक सवाई महोत्सवासाठी किमान 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी महापौर मुरालीधर मोहोळांच्या मदतीने जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेणार आहेत. तसेच त्यांच्याकडे महोत्सवाचे आयोजन करण्याविषयी चर्चा करणार आहेत.
पालकमंत्र्यांनी दिले होते हे आदेश
ओमीक्रॉनचा व्हेरियंट येण्यापूर्वी जिल्हापालक मंत्री आजित पवार यांनी पुण्यात व बैठक घेत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी पुण्यातील चित्रपटगृहांसह , नाट्यगृह सुरु तसेच सांसकृतिक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने आयोजित कराण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी कोरोनाचे आवश्यक ते निर्बंध पाळण्यासही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांनंतर भारतात ओमीक्रॉनचा रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या नियमावलीत बदल केले. त्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले.
पुण्यात आतापर्यंत 598 परदेशी नागरिक आले असून , त्यांची यादी पुणे जिल्हा प्रशासनाने बनवली आहे. तर दुसरीकडं शहरातील कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शोधलं डिस्टन्सचे पालन, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे. नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे असेही सांगण्यात येत आहे.
सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा
पर्यटनाचा प्लॅन बनवत आहात? तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर
देशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण