राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा केले जाणार आहेत. याआधी जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 3000 रूपये बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठ गाव-खेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. पण ज्यांना अजून अर्ज भरता आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बंद केले आहे. (mukhyamantri majhi ladki bahin yojana online application is closed)
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती. पण नंतर ती वाढवण्यात आली आहे. ‘नारी शक्ति दूत’ या ॲपमधून योजनेसाठी आधी अर्ज करत येत होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जात होते. पण आता ते बंद झाले आहे. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातील अॅपद्वारे अर्ज भरताना देखील तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर सरकारने www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली. नारी शक्ति दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना “NO NEW FORM ACCEPTED “ असा मेसेज येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविका यांना संपर्क करण्याचा मेसेज येत आहे.
माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांना या योजनेसाठी अर्ज केले. सुरुवातीला अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अर्ज भरतण्यासाठी बराच वेळ लागत होता. ऑनलाइन पद्धतीने आणि नारी शक्ति दूत ॲपद्वारे अर्ज घेणे सुरु केल्याने त्याचा फायदा अनेक महिलांना घेता आला पण आता दोन्ही पद्धतीने अर्ज बंद झाल्याने महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील आहे. सरकारने www. ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईटच्या माध्यामातून पुन्हा अर्ज घ्यावे अशी मागणी महिला करत आहेत.
राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांनाय या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी काही अटी देखील आहेत. त्यामुळे अर्ज भरताना त्या आधी वाचून घ्याव्यात. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.