मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. राज्यात अमरावती, मालेगावमध्ये निघालेले मोर्चे हे नियोजन करून निघाले. त्याला सरकारचे समर्थन होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पेटलेला महाराष्ट्र, नक्षलवाद आणि राजकारण याविषयांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चोहोबाजूंनी घेरले.
राहुल यांच्या ट्वीटनंतर दंगली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग आहे. या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.
दंगलीचा पॅटर्न समजून घ्या
फडणवीस पुढे म्हणाले की, अमरावतीमध्ये जवानांच्या सात कंपन्या होत्या. मोर्चा निघाला. तोडफोड झाली. मात्र, पहिल्यांदा त्यांना आदेशच आला नाही. त्यानंतर आदेश दिला त्यावेळी त्या कंपन्यांवर हल्ला. हा पॅटर्न समजून घ्या. जवानांवर अचानक टोकदार गोटे फेकण्यात आले. हे दगड जमा करून ठेवलेले नव्हते, तर ते आले कसे, असा सवाल त्यांनी केला. पोलिस आणि जवानांवर हल्ला केल्यानंतर एका माणसालाही अटक नाही. या पोलिसांवर ठरवून हल्ला केला. हा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी यांच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून लोकांमध्ये कन्फ्यूजन तयार करा. आजूबाजूच्या राज्यातल्या लोकांना त्यात ओढा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
…तर भुजबळांविरोधातली याचिका मागे घेणार; आमदार कांदेंची अट; अन्यथा दरी वाढेल असा इशारा
प्रोटेक्ट टू Crime आणि प्रोटेक्ट टू Terrorism सरकारची भूमिका; भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप