पालघर / मोहम्मद हुसैन (पालघर प्रतिनिधी) : धरणावर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून (Drowned) मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना पालघरमधील सफाळे करवाले डॅम (Karwale Dam)वर घडली आहे. प्रविण प्रभाकर पाटील (25) असे बुडून मेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सफाळे येथील नवघरचा रहिवासी होता. तरुणाचा डॅममध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात येईल. (A young man drowned while taking a bath in Safale Karwale Dam in Palghar)
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे येथील करवाले डॅमवर नवघर गावातील काही तरुण आले होते. त्यातील प्रविण प्रभाकर पाटील याने पाण्याच्या टाकीवर चढून पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि तरुण पाण्यात गेलेला पुन्हा बाहेर आलाच नाही. प्रविणचा डॅममध्ये उडी मारतानाचा व्हिडीओ त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
विहिरीत पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे घडली आहे. मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका तरुणाचा समावेश आहे. सार्थक शंकर ढोबळे (11) आणि अतुल मुरकुटे (21) अशी दोघा मयतांची नावे आहेत. सार्थक ढोबळे हा मुलगा आपल्या शेतातील विहिरीजवळ खेळत असताना विहिरीत पाय घसरून पडला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या घटनेत याच गावातील अतुल मुरकुटे हा तरुण देखील शेतातील विहिरीत पडला असता त्याचा मृत्यू झाला आहे. (A young man drowned while taking a bath in Safale Karwale Dam in Palghar)
इतर बातम्या
Nashik Crime : नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ