परभणी : अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाळू माफियांनी मारहाण (Beating) केल्याने जखमी तरुणाचा उपाचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथे 24 मार्च रोजी ही धक्कादायक घटना घडली. मात्र गुन्हा आज नोंद करण्यात आला. माधव त्र्यंबक शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, गंगाखेड ठाण्यात आठ जणांविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. (A young man who was seriously injured in a sand mafia beating died during treatment)
गंगाखेड तालुक्यासह पालम तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. या वाळू घाटासह इतर ठिकाणाहून देखील वाळूमाफिया गौण खनिज उत्खननाच्या नियमाची पायमल्ली करत दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी माधव त्रिंबक शिंदे यांनी रात्रीच्या वेळी वाळू उपसा करू नये असे सांगितल्याचा मनात राग धरून वाळूमाफियांनी मारहाण केल्यामुळे माधव शिंदे यांचा मृत्यू झाला.
पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य यांचा मुलगा माधव त्रिंबकराव शिंदे हे रात्रीच्या वेळी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यास विरोध करत होते. त्यामुळे प्रकाश डोंगरे व धक्यातील भागीदारांची माधव शिंदे यांच्यावर खुन्नस होती. 24 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता सुरेश शिंदे व इतर दोघे गोदावरी नदी पात्रात जाणार्या रस्त्याने दुचाकीवरून गेले. ठेकेदार प्रकाश डोंगरे, भागीदार संदिप शिंदे, भागवत शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे तेथे उभे होते. यावेळी माधव शिंदे यांनी रात्रीच्या वेळी वाळू नियमानुसार काढता येत नाही, असे सांगितले.
रेती बंद होणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत राजूभाऊ बोबडे याने हातातील रॉडने माधव शिंदे यांच्या कमरेखाली मारहाण केली. त्यानंतर प्रकाश डोंगरे याने शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच भागवत प्रकाश शिंदे, संदिप शिंदे, सर्जेराव शिंदे, ओमप्रकाश शिंदे, सुरेश शिंदे यांनी लाथाबुक्याने मारहाण केली. माधव शिंदे यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र 25 मार्च रोजी माधव शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन दिवस सदरील प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे येऊन श्रावण रामेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश डोंगरे, सुरेश शिंदे, ओमप्रकाश शिंदे, संदीप शिंदे, भागवत शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. (A young man who was seriously injured in a sand mafia beating died during treatment)
इतर बातम्या
Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
लायटरच्या जीवावर चोर मांगे More! लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटक