सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झालेले भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला. नारायण राणे यांना जामिन मिळाल्यानंतर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. (After Narayan Rane was granted bail, BJP workers celebrated in Sindhudurg)
रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिक रित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलंय. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तीवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (After Narayan Rane was granted bail, BJP workers celebrated in Sindhudurg)
IBPS RRB PO Result 2021 : आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, असा तपासाhttps://t.co/jXxyPnpHmf#IBPSRRBPOResult2021 |#OfficialWebsite |#Declaired
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
संबंधित बातम्या
Narayan Rane Bail : नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर, महाड कोर्टात नेमकं काय घडलं?