“निर्णय न घेता घोषणा केली आहे त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो”; अहमदनगर जिल्ह्याच्या नामकरणावर राष्ट्रवादीने नेमकं ते सांगितलं

| Updated on: Jun 01, 2023 | 10:52 PM

काही तालुके विकासापासून वंचित राहिले आहेत तर काही तालुक्यांमध्ये विकासच झाला नाही. त्यामुळे काही लोकं राजकारणासाठीच बोलत असतात याचाही अभ्यास केला पाहिजे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

निर्णय न घेता घोषणा केली आहे त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो; अहमदनगर जिल्ह्याच्या नामकरणावर राष्ट्रवादीने  नेमकं ते सांगितलं
Follow us on

अहमदनगर : शिवसेना आणि भाजपच्या सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्यात आल्यानंतर विरोधकांनीही त्याचे स्वागत केले. मात्र आता ज्या प्रमाणे या जिल्ह्याचे नावामध्ये बदल केला आहे, त्याच प्रमाणे त्या नावातील बदलाबाबतही लवकरात लवकर अध्यादेश काढून तो अंमलात आणावा अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामाकरण केले जात असल्याची घोषणा कालच्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त करण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ही आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नामाकरण करण्यात आले त्यानंतर अहिल्यादेवीनगर नावाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले. त्याचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसनेही केले.

मात्र आज आमदार रोहित पवार यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, निर्णय न घेता घोषणा केली आहे त्या गोष्टीचंही आम्ही स्वागत करतो असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवीने कुठलाही भेदभाव न करता सामान्य माणसांसाठी काम केलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीचे जर नाव या जिल्ह्याला मिळत असेल तर त्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे असंही रोहित पवार यांनी सांगितले.

ज्या प्रमाणे जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच प्रमाणे आता याचा जीआर लवकरात लवकर निघावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी सामंजस्यपणाची भूमिकाही रोहित पवार यांनी घेतली आहे.

यावेळी त्यांनी जिल्हा अभयारण्याची मागणीविषयी बोलताना सांगितले की, जिल्हा अभयारण्याची मागणी कोण करतात तर काही नेते आणि काही लोक करत असतील, मात्र त्याच्यामागे काहीतरी कारणही असू शकतं असंही त्यांनी बोलताना सांगितले.

काही तालुके विकासापासून वंचित राहिले आहेत तर काही तालुक्यांमध्ये विकासच झाला नाही. त्यामुळे काही लोकं राजकारणासाठीच बोलत असतात याचाही अभ्यास केला पाहिजे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

त्याच बरोबर त्यांनी जिल्हा विभाजनावर बोलताना सांगितले की, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे, तर लोकांना विचारूनच जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला गेला पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.