डिसेंबरमध्ये सैन्य भरतीची तयारी सुरू होईल, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे आश्वासन; सदाभाऊ खोतांची माहिती

| Updated on: Sep 17, 2021 | 10:12 PM

सैन्य भरती व पोलीस भरती तात्काळ व्हावी व वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

डिसेंबरमध्ये सैन्य भरतीची तयारी सुरू होईल, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे आश्वासन; सदाभाऊ खोतांची माहिती
Follow us on

कोल्हापूर : सैन्य भरती व पोलीस भरती तात्काळ व्हावी व वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. (army recruitment Preparations will begin in December, Kolhapur district administration assured; Sadabhau Khot)

यावेळी खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवदेन दिले. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सैन्य भरती व पोलीस भरती झालेली नाही. यामुळे अनेक तरुण मुलांचे वय पात्रतेचे संपले आहे. जानेवारी 2021 मध्ये सैन्य भरतीचे अर्ज सुटले होते, सदरची सैन्य भरती मार्च 2021 मध्ये होणार होती. परंतु ती सैन्य भरती कोरोनामुळे स्थगित झाली. त्यामुळे त्याच अर्जावरती भरती होणे अत्यंत आवश्यक आहे.

सैन्यामध्ये सोल्जर जीडी पदासाठी वयाची अट 17.6 ते 21 वर्षे आहे. सोल्जर टेक्निकल ट्रेडमन, क्लार्क व नर्सिंग असिस्टंट या पदाची वयोमर्यादा 17.6 ते 23 वर्षे आहे. गेली दोन वर्षे भरती झाली नसल्यामुळे अनेक तरुणांचे वय संपले आहे. कोरोना काळापुरते दोन वर्षे वय वाढवून मिळावे व या वर्षीची नियोजित सैन्य भरती त्वरित घ्यावी. तसे नाही झाले तर येणारेही वर्ष जाण्याची भीती आहे. अशा विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक तरुण युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहीला होता.

दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यामध्ये सैन्य भरती घेण्याची तयारी सुरु केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळाला दिले आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

इतर बातम्या

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर

(army recruitment Preparations will begin in December, Kolhapur district administration assured; Sadabhau Khot)