दिवसागणित महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत, निष्पाप चिमुकल्यां विकृत लोकांच्या शिकार बनत आहेत, एखाद्या व्यक्तीच्या मनात विकृती कशी येते, त्यामागे काही कारणे आहेत का? याला थांबवणे शक्य आहे का? लहान मुलांना या गोष्टी सांगाव्या तरी कशा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. प्रत्येक ठिकाणी पालक आपल्या मुलांसोबत राहू शकत नाही, अशावेळी मुलांना या गोष्टींची माहिती कशी द्यावी, असा प्रश्न पालकांना पडतो. याप्रकरणी मानसोपचार तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.
विकृत लोक जवळचेच
त्यावर नांदेड येथील मन दर्पण हॉस्पिटलचे संचालक मानसोपचार तज्ञ डॉक्टर रामेश्वर बोले यांनी प्रतिक्रिया दिली. लहान बालकांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक समजून सांगितला पाहिजे, जवळपासच्या, ओळखीच्या लोकांकडूनच असे कृत्य केले जातात त्याच्या हालचालीवर लक्ष दिले पाहिजे. तसेच सामाजिक स्तरावर लैंगिक शिक्षणावर जनजागृती केली पाहिजे असेही बोले म्हणाले.
विकृतीमागील कारण काय
विरुद्ध व्यक्तीचं आकर्षण असणं ही झाली नैसर्गिक भावना, विकृती करण्याची भावना लहानपणापासून मनात रुजली जाते आणि मोठे होऊन ती पुढे येते. पिडोफाईल हा मानसिक एक मानसिक आजार आहे, या मध्ये लहान मुलाबाबत काम भावना येणे.अशा विकृत लोकांना ओळखणं कठीण आहे, पण आपण जागृत असलो तर त्यांचे व्यवहार, त्यांच्या हालचाली, त्यांच्या कृतीवरून ओळखू शकतो. जेव्हा एखाद्या लहान मुलांना, मुलींना ते घेतात कशी जवळीक साधतात, त्यांना काय अमिष देतात यावर बारकाईने लक्ष दिले तर अंदाज देऊ शकतो, असे बोले यांनी स्पष्ट केले.
पालकांनी काय घ्यावी काळजी
पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. पालक जेव्हा मुलाला शाळेत पाठवतात तेव्हा ते बिनधास्त असतात या विश्वासावर राहणे आता जमणार नाही. सोबतच मुलांना लैंगिक शिक्षण बॅड टच गुड टच काय असतो हे सांगितलं पाहिजे. बॅड टच म्हणजे वाईट अर्थाने केलेला स्पर्श, गुड टच म्हणजे सर्वसाधारणपणे केलेला स्पर्श, याची माहिती पालकांनी मुलांना द्यावी.
समाज म्हणून काय घ्यावी काळजी
कायदा व्यवस्था कठोर केली पाहिजे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पालक मूल व शिक्षकांचे लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती केली पाहिजे. जेव्हा एखादी संस्था कर्मचारी ठेवते तेव्हा त्यांची पार्श्वभूमी माहीत करून घेतली पाहिजे. शाळा संस्थांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे, चाइल्ड पोर्नोग्राफी यावर कडक निर्बंध आणले पाहिजे.
विकृत लोक लहान बालकांना कसं बनवतात शिकार
शक्यतो ओळखीचे, नातेवाईक किंवा आजूबाजूचे हीच लोक या विकृतीमध्ये सहभागी असतात.
हे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्यावर कोणाचाही संशय येत नाही.
लहान बालक कमजोर असतात म्हणून ते त्यांना प्रतिकार करू शकत नाहीत.
त्यांच्यावर होणारा अत्याचार त्यांना समजत नाही, अत्याचार झाल्यानंतर ते समजून सांगू शकत नाहीत.