सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी संपली आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर मार्ग निघाला आणि ते बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कराड सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाळासाहेब पाटील बिनविरोध निवडून यावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी उमेदवार उदयसिंह पाटील यांच्याशी चर्चा करण्यात होती. अर्ज मागं घेण्याच्या अखेरच्या वेळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उदयसिंह पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र तोडगा न निघाल्यानं अखेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटीलचं निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मेहनत करावी लागणार आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील जिल्हा बँकेत मानद संचालक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक लढवत थेट संचालक होण्याचा निर्णय घेतला. सहकारमंत्र्यांनी यावेळी कराड तालुक्यातून सोसायटी गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कराडमध्ये त्यांच्यासमोर विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचं कडवं आव्हान आहे. अजित पवार यांनी थेट उदयसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच तोडगा न निघाल्यानं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील यांच्यात लढत होणार आहे.
भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!
जिल्हा बँक निवडणुकीत पॅनेल उभं करु अशी घोषणा करणाऱ्या आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माघार घेतली आहे. दोन्ही भाजपच्या नेत्यांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
उदयनराजे भोसले यांची गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून बिनविरोध निवड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजे यांच्या जागेला विरोध असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अर्ज माघारी घेण्याची दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय.तर, शिवेंद्रराजे भोसले यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.
एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला मार्ग सांगितला? सरकार करणार का?
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Balasaheb Patil contest Satara District Co Operative Bank Election Udaysingh Patil