लेकासह छोट्या पाहुण्याला घेऊन शेतावर, दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले, बुडताना पाहून बापाचे वाचवण्याचे प्रयत्न, पण तिघेही बुडाले

| Updated on: Jun 11, 2021 | 8:14 AM

चिमुरड्यांना बुडताना पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी घेतली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आपला चिमुरडा लेक, घरी आलेला छोटा पाहुणा आणि स्वत: सुनील पंडित यांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. (beed Three people drowned in a farm pond) 

लेकासह छोट्या पाहुण्याला घेऊन शेतावर, दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले, बुडताना पाहून बापाचे वाचवण्याचे प्रयत्न, पण तिघेही बुडाले
तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू...
Follow us on

बीड : आपल्या मुलासह घरी आलेल्या छोट्या पाहुण्याला घेऊन सुनिल पंडित गावाकडच्या शेतात गेले. शेतात शेततळं पाहिल्यानंतर मुलांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी पोहण्याचा नाद धरला. मग सुनिल पंडित यांचा 12 वर्षांचा मुलगा मुलगा आणि पत्नीचा भाचा 10 वर्षीय आदित्य शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरले. पण ते बुडू लागले. त्यांना वाचवायला सुनिल पंडित स्वत: शेततळ्यात उतरले पण काहीच उपयोग झाला नाही. या घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. (beed Three people drowned in a farm pond)

ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40), त्यांचा मुलगा राज पंडित (12) आणि सुनील पंडित यांच्या पत्नीचा भाचा आदित्य पाटील (10, रा. शेवगाव) या तिघांचा समावेश आहे.

शेततळ्यावर गेले पण माघारी आलेच नाही…!

गेवराई येथे सुनील पंडित यांचा चार चाकी वाहन खरेदी विक्रीसह फायनान्सचा व्यवसाय आहे. ते मागील काही वर्षांपासून शहरातच वास्तव्यास आहेत. दरम्यान, पंडित हे गुरुवारी दुपारी मुलगा राज व पत्नीचा भाचा आदित्य या दोघांना घेऊन त्यांच्या दैठण येथील शेतात गेले होते. यानंतर ते शेतातील शेततळ्यावर गेले होते. यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा आदित्य पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारून मारली.

चिमुरड्यांना बुडताना पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी घेतली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आपला चिमुरडा लेक, घरी आलेला छोटा पाहुणा आणि स्वत: सुनील पंडित यांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला.

(beed Three people drowned in a farm pond)

हे ही वाचा :

नागपूरच्या चिमुकलीला दुर्धर आजार, एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये

Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..