हा महाराष्ट्र, इथं मराठीतच बोलायला हवं; मातृभाषेत सूत्रसंचालन करा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आग्रह

| Updated on: Nov 26, 2021 | 9:27 AM

यवतमाळ येथील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेंसंदर्भात आग्रही भूमिका घेतल्याचं समोर आलं. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं, अशी भूमिका राज्यापालांनी घेतली.

हा महाराष्ट्र, इथं मराठीतच बोलायला हवं; मातृभाषेत सूत्रसंचालन करा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आग्रह
BHAGAT SINGH KOSHYARI
Follow us on

यवतमाळ: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतात. राज्यपाल यावेळी एका चांगल्या बाबीसाठी चर्चेत आहेत. यवतमाळ (Yavatmal) येथील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेंसंदर्भात ( Marathi Language) आग्रही भूमिका घेतल्याचं समोर आलं. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं, अशी भूमिका राज्यापालांनी घेतली. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजीमध्ये करण्यात येणाऱ्या सूत्रसंचालनावरुन राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमामंध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे, अशी आग्रही भऊमिका राज्यापालांनी मांडली. मराठी भाषा ही मातृभषा आहे याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असंही ते म्हणाले.

राज्यपालांनी सांगितला किस्सा

महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांमध्ये बोलावण्य यायंचं. त्यावेळी एका कार्यक्रमात सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलत होता. त्या व्यक्तीला हटकत तुला मराठी ठाऊक नाही का? असा सवाल केल्याचं राज्यपालांनी सांगितलं.त्यावेळीच त्याला हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे, प्रमुख पाहुणा इतर राज्यातील असला किंवा परदेशातील असला आणि त्याला मराठी हिंदी समजत नसेल तर इंग्रजीचा वापर करण्यास हरकत नाही, असं राज्यपाल म्हणाले.

मराठी भाषा हिंदी आणि संस्कृत प्रमाणं गोड

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी ही भाषा संस्कृत आणि हिंदी प्रमाणेच गोड असल्याच सांगितलं. मराठी भाषा सरळ, साधी आहे. मराठीचं वाचन करु शकतो आणि समजू शकतो, असं देखील राज्यपाल म्हणाले.

इतर बातम्या:

महाराष्ट्रात काय घडतंय? महिला ऑपरेशन्स घटले, कॉन्डोमचा वापर वाढला, नवरा बायकोच्या भांडणांचा जोर

सांगलीच्या डॉ. आदित्यराज घोरपडे यांची मानद प्राणी कल्याण अधिकारीपदी नियुक्ती; या पदावर संधी मिळालेले घोरपडे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती

Bhagatsingh Koshyari said Marathi will compulsory in Maharashtra