मुंबई: सिंधुदुर्गातील नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी तुफान राडा झाला आहे. यानंतर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगेचच ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना (Shivsena) पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता या ट्विटला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (BJP Leader Nilesh Rane get angry on Shivsena after clashes in Sindhudurg)
शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 19, 2021
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला (BJP) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा (Shivsena) आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे.
त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या:
शिवसेना भवनानंतर कोकणातही राडा, आमदार वैभव नाईक राणेंच्या पेट्रोल पंपावर, सेना-भाजप धुमश्चक्री
VIDEO: आदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; एका रुपयात 1 लीटर पेट्रोल
वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर ‘हर हर महादेव’ गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा
(BJP Leader Nilesh Rane get angry on Shivsena after clashes in Sindhudurg)