दिल्ली, नवी मुंबई, नाशिक, पंकजा मुंडेंनी कार्यक्रमच जाहीर केला, गावागावात जाऊन संवाद साधणार

| Updated on: Oct 15, 2021 | 3:49 PM

मी 17 ते 20 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीमध्ये आहे. 23 ते 25 या काळात मी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये आहे. त्यानंतर 29 ते 31 ऑक्टोबर या काळात मी नाशिकमध्ये आहे. मी 12 डिंसेबरला मी उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांची चौकशी करणार आहे," अशा शब्दात भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला दौरा सांगितला.

दिल्ली, नवी मुंबई, नाशिक, पंकजा मुंडेंनी कार्यक्रमच जाहीर केला, गावागावात जाऊन संवाद साधणार
pankaja munde
Follow us on

बीड (सावरगाव) : “मी 17 ते 20 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीमध्ये आहे. 23 ते 25 या काळात मी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये आहे. त्यानंतर 29 ते 31 ऑक्टोबर या काळात मी नाशिकमध्ये आहे. मी 12 डिंसेबरला मी उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांची चौकशी करणार आहे,” अशा शब्दात भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला दौरा सांगितला. पंकजा मुंडे घरात बसून होत्या असा आरोप अनेक जणांकडून होत होता. त्याला उत्तर म्हणून मुंडे यांनी वरील कार्यक्रम जाहीर केला. त्या सावरगाव येथे भगवान गडावर भाषण करत होत्या.

मी घरात बसले नाही, कोव्हिड सेंटर सुरु केलं

तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनास्थितीवर देखील भाष्य केलं. “लोकांना रेमडेसिव्हीर मिळाले नाही. पलंग मिळाले नाही. लोक मरत होते. औषध मिळत होते, लोकांची अशी अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का ? मी घरात बसले नाही. मी कोव्हिड सेंटर सुरु केलं. लोक घरातील महिलांना उपचारासाठी माझ्याकडे पाठवत होते,” असेदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाषणादरम्यान मोहन भागवत यांची आठवण

यावेळी बोलताना त्यांनी, “मगाशी माझं हेलिकॉप्टर उडालं, परत खाली बसलं. तुम्हाला कदाचित काळजी वाटली असेल. मला वाटलं कुणाची दृष्ट लागली की मेळाव्याला. सकाळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा बघत होते. सन्मानीय परमपूज्यनीय मोहन भागवत यांचं भाषण ऐकत होते. ते संदेश देत होते की, या देशात भेदभाव व्हायला नको. अरे मुंडे साहेबांनी हा भेदभाव मिटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. या मंचावर कोण नाही? सगळ्या जाती-धर्माचे, विचारांचे आहेत. या मंचावर पोहोचलेला माणूस कष्ट करुन पोहोचला आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडेची भाषणदरम्यान शेरेबाजी

तसेच पुढे बोलताना “मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?,” असं भाष्य मुंडे यांनी केलं.

इतर बातम्या :

गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, जानकर म्हणतात, मेलो तरी साथ सोडणार नाही

शेतातच ‘लाल चिखल’ होत असलेला टोमॅटो आज दरात ‘टॅाप’वर

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?