Chandrapur Crime | चंद्रपुरात दारू वाहतुकीच्या मदतीसाठी मागितली लाच; एसडीपीओचा रायटर व अंगरक्षक जाळ्यात

| Updated on: Apr 30, 2022 | 9:58 AM

अटक करण्यात आलेले आरोपी हे राजुरा उपविभागीय कार्यालयातील एसीडीपीओ राजा पवार यांच्या जवळचे आहेत. एक राजा पवार यांचे रायटर आहेत, तर दुसरे अंगरक्षक आहेत. राजेश त्रिलोकवार व सुधांशू मडावी अशी आरोपींची नावं आहेत.

Chandrapur Crime | चंद्रपुरात दारू वाहतुकीच्या मदतीसाठी मागितली लाच; एसडीपीओचा रायटर व अंगरक्षक जाळ्यात
राजेश त्रिलोकवार व सुधांशू मडावी
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : राजुरा उपविभागीय कार्यालयातील (Rajura Sub-Divisional Office) एसडीपीओ राजा पवार यांचे रायटर व अंगरक्षकाला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एसडीपीओ कार्यालय बाहेरील चहा टपरीवर ही कारवाई करण्यात आली. रायटर राजेश त्रिलोकवार (वय 51) व अंगरक्षक सुधांशू मडावी (वय 36) असे अटकेतील पोलिसांचे नाव आहे. तक्रारकर्त्याला दारूच्या वाहतूक प्रकरणी राजुरा ठाण्यात (Rajura Police) गुन्हा दाखल आहे. त्यात मदत करण्यासाठी त्रिलोकवार (Rajesh Trilokwar) व मडावी यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्याने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने सापडा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली.

आरोपीवर दारुच्या वाहतूक प्रकरणी गुन्हे

अटक करण्यात आलेले आरोपी हे राजुरा उपविभागीय कार्यालयातील एसीडीपीओ राजा पवार यांच्या जवळचे आहेत. एक राजा पवार यांचे रायटर आहेत, तर दुसरे अंगरक्षक आहेत. राजेश त्रिलोकवार व सुधांशू मडावी अशी आरोपींची नावं आहेत. ज्या व्यक्तीनं तक्रार केली, त्याच्यावर दारुच्या वाहतूक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे कमी कसे करता येतील, यासाठी यांनी लाच मागितली होती. पण, एवढी रक्कम देणे शक्य नसल्यानं त्यानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. पथकानं सापडा रचून दोघांनाही बेळ्या ठोकल्या.

यांच्या पथकाने केली कारवाई

नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारात ही कारवाई केली. रायटरच्या गाडीतून सुमारे अडीच लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक वर्षा मते, अनिल बाहरे, अमोल मेघरे, विकास गडपायले यांनी केली.

हे सुद्धा वाचा