जालना : जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये हवेतून ऑक्सिजन शोषूण घेणाऱ्या व त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याची महिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Cancer Patients no longer need to go to Mumbai, treatment will be done in Jalna, Rajesh Tope Inaugurates PSA project)
हवेतून ऑक्सिजन शोषूण त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए (Pressure Swing Adsorption) या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचा शुभारंभ तसेच प्रयोगशाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक (Fully Automated Chemistry Analyser), कर्करोग बाह्यरुग्ण विभाग आणि उपचार केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. आरेग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते हा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उप विभागीय अधिकारी सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जिल्हा वार्षिक येाजनेच्या माध्यमातून 80 लाख रुपये खर्च करुन हवेतून ऑक्सिजन शोषूण त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. हा प्लांट अत्यंत आधुनिक असून याद्वारे 600 लीटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती करता येईल. दरदिवशी 125 जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता या प्लांटमध्ये आहे.
जालना जिल्ह्यात अनेक स्टील उद्योगांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्लांटची उभारणी केली असून जालना जिल्हा हा ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण झाला असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डीआरडीओ, एसडीआरएफ, सीएसआर तसेच जिल्हा नियोजन मंडळातून आधुनिक असे पीएसए प्लांट उभारण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक प्रणाली उभारण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे ब्लडशुगर, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन टेस्ट, शरीरामधील इलेक्ट्रोलाईट सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम यासह 50 रुग्णांच्या 360 प्रकारच्या विविध चाचण्या केवळ एका तासामध्ये या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून या आजाराच्या प्रतिबंधासाठी तसेच या आजारावरील उपचारासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्र सुरु करण्यात आलं आहे. औरंगाबाद येथे कर्करोगावर उपचार करणारे रुग्णालय असून त्याचेच स्पोक मॉडेल म्हणून याठिकाणी बाह्यरुग्ण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. येथे कर्करोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केमोथेरेपी व स्क्रिनिंगची सुविधाही याठिकाणी रुग्णांना उपलब्ध होणार आहे. राज्य शासन व सीएसआरच्या माध्यमातून 30 ते 35 कोटी रुपये खर्च करुन कोबाल्ट युनिट (रेडीएशन सुविधा) लवकरच या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे सांगत रुग्णांना कर्करोगाच्या उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, असे टोपे म्हणाले. जालन्यात कर्करोगारावरील उपचाराची मोफत व्यवस्था उपलब्ध झाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला पालकमंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन लसीकरण कार्यक्रमाची पाहाणी केली. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस हीच आपली कवच कुंडले असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने लसीबाबत मनात कुठलीही शंका न बाळगता लस टोचून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
इतर बातम्या
Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती
मोठी बातमी, स्पुतनिक वी लस पुण्यात दाखल, पुणेकरांना ‘या’ तारखेपासून लस मिळणार
ठाण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण, पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
(Cancer Patients no longer need to go to Mumbai, treatment will be done in Jalna, Rajesh Tope Inaugurates PSA project)