भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरात बेकायदेशीर गर्दी जमवल्याचा आरोप

| Updated on: Sep 28, 2021 | 3:52 PM

भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना नियमांतर्गत लोकांना जमवण्यास बंदी असताना मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरात बेकायदेशीर गर्दी जमवल्याचा आरोप
ranjit naik nimbalkar
Follow us on

सोलापूर : भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना नियमांतर्गत लोकांना जमवण्यास बंदी आहे. असे असताना भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल (27 सप्टेंबर) धर्मवीर संभाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. (case registered against bjp mp ranjit naik nimbalkar in solapur for gathering people)

बेकायदेशीर गर्दी जमवल्यामुळे गुन्हा दाखल 

धर्मवीर संभाजी महाराज चौकात सोमवारी भाजप नेते तसेच कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर, श्रीकांत देशममुख तसेच लक्ष्मण ढोबळे आदी नेते उपस्थित होते. या बेकायदेशीर गर्दीमुळे चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप नेते, कार्यक्रते संभाजी महाराज चौकात का जमले होते ?

दोन आठवड्यांपूर्वी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सोलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. भाजपच्या या आंदोलनानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी श्रीकांत देशमुख यांना फोनवरून जाब विचारला होता. तसेच त्यांना सोलापुरात येण्याचे आव्हान दिले होते.

बरडेंचे आव्हा स्वीकारत भाजप नेते  दाखल  

बरडे यांचे आव्हान स्वीकारत श्रीकांत देशमुख सोलापुरातल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच देशमुख यांच्यासोबत खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी नेत्यांनी हजेरी लावली होती. याच कारणामुळे श्रीकांत देशमुख, रणजित नाईक निंबाळकर आमि लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील काराई करत आहेत.

इतर बातम्या 

VIDEO | राम कृष्ण हरि! ताजोद्दिनबाबांनी भर किर्तनात देह ठेवला, ‘त्या’ व्हिडीओनं महाराष्ट्रावर शोककळा, ह्रदयविकाराचा झटका

Aurangabad | नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने केली सुटका

Video: उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत, अन्यथा मेले असते, शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली

(case registered against bjp mp ranjit naik nimbalkar in solapur for gathering people)