मुंबई : अटकेच्या कारवाईनंतरही नव्या दमाने जनआशीर्वाद यात्रा सुरू करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राजकीय टोलेबाजी सुरूच ठेवली आहे. दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट असल्याचे विधान त्यांनी आज केले. यावर पुढे काय असं विचारताच, त्यांनी मी सांगतो लगे रहो! असे उत्तर दिले. हे विधान करतानाच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास विसरले नाहीत. 1 लाख 57 हजार माणसे मारण्याचे काम या एकनंबरवाल्या मुख्यमंत्र्यांनी केलेय, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचले, तर संजय राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. (Central minister Narayan Rane Target Uddhav Thackarey and Sanjay Raut in jan ashirwad yatra)
नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका सुरूच ठेवली आहे. हे मुख्यमंत्री बाहेर पडत नाही, मात्र हात धुवा, मास्क लावा, असा सल्ला देताहेत. हे पिंजऱ्यात बसून या गोष्टी करायला सांगताहेत. ह्यांचे सगळे लक्ष नारायण राणे काय करतात, कुठे जातात याकडे आहे. शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे. आता जी टकली फिरतात, सत्ता उपभोगतात ते त्यावेळी शिवसेनेत नव्हते. आम्ही बाळासाहेबांच्या पाठिशी उभे होतो. शिवसेना घडवली म्हणून उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री आहात. उद्धवजी, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करु नका. काम जमत नसेल तर घरात बसा, असा इशारा राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला. याचवेळी हा कसला मुख्यमंत्री? हा कॅबिनेटला जात नाही. पिंजऱ्यातला मुख्यमंत्री, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नारायण राणेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणतात, त्यांच्या खात्याला पैसे नाही, मग तुम्ही काय केले? असा सवाल करतानाच त्यांनी आपल्या टीकेची गाडी संजय राऊत यांच्यावर घसरवली. त्यांनी राऊतांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांच्यावर तोफ डागली. बिनखात्याचा संजय राऊत काय बोलतो? संजय राऊत यांनी आज सामनात अग्रलेख लिहिला. त्याला उत्तर प्रहारमधून मिळेल. तुमच्या मालकाची मुले कुठे जातात? काय करतात? हे बघा, असा इशारा देत राणेंनी संजय राऊतांच्या आडून ठाकरे कुटुंबियांवरही हल्लाबोल चढवला. तसेच माझ्या विधानानंतर माझ्या घरावर आलेल्या लोकांविरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट आहे. मला अनेक केंद्रीय मंत्र्यांचे फोन आले. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. पुढे काय असं विचारतात. मी सांगतो, लगे रहो… असे सांगत नारायण राणेंनी आपल्या टोलेबाजीच्या पुढील धडाक्याची उत्सुकता निर्माण केली आहे. (Central minister Narayan Rane Target Uddhav Thackarey and Sanjay Raut in jan ashirwad yatra)
तिने चहामधून दंश टाकला होता, त्यांनी अमृत मानून प्राशन केलं, दीड वर्षाचा चिमुकला हरपला, 5 जण रुग्णालयातhttps://t.co/3IVjIDdr9d#Crime #CrimeNews #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2021
इतर बातम्या
Video | काचेच्या बॉटलसोबत स्टंटबाजी केली, पुन्हा रडायला लागला, पाहा नेमकं काय घडलं ?