नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यानी नांदेडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून घेतलं. मात्र, पोलिसांना या आंदोलनाची कल्पना असल्यानं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी आंदोलकांजवळील पेट्रोलचा कॅन जप्त केला. तसेच छावाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
VIDEO: मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, नांदेडमध्ये छावाचे कार्यकर्ते ताब्यात@AshokChavanINC #Nanded #MarathaReservation #Chhava pic.twitter.com/BEetEyNJAo
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 19, 2021
आंदोलनाच्या वेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाबाबत मागणी केली. यावेळी पोलिसांनी छावाच्या कार्यकर्त्याना अटक करून वजीराबाद पोलीस ठाण्यात नेलं.
दरम्यान, शुक्रवारी (20 ऑगस्ट) छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्येच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मूक मोर्चा आंदोलन आहे. त्या पार्श्वभूमीवर छावाने मात्र ठोक मोर्चाच्याच भूमिकेचा आग्रह धरत आजचं आंदोलन केलंय. मराठा आरक्षणासाठी आता मूक आंदोलनाला काही अर्थ नाही, अशी भूमिका छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी मांडली.