आज सोमवार , 5 डिसेंबर 2022. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक होणार आहे. युती करण्यासाठी या दोन्ही नेत्यांची बैठक होत आहे. तब्बल पाच दशकानंतर शिवशक्ती-भीमशक्तीमध्ये मोठं राजकीय समीकरण होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. यासह पुणे, नाशिक, नागपूर आणि अन्य शहरात आज काय घडतंय? यासह मनोरंजन आणि क्रिडाविश्वातील घडामोडींचे अपडेट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील एका क्लिकवर…
महाराष्ट्र सदनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रपती भवनाकडे रवाना
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जी ट्वेंटी शिखर परिषदे संदर्भात होणार बैठक
मुंबई : वंचित आणि ठाकरे गट एकत्र येणार का, याकडे राज्याचं लक्ष, ठाकरे आणि आंबेडकर यांची आज ग्रॅन्ड हयातमध्ये बैठक होणार असल्याची माहिती, बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष
नाशिक : महाराष्ट्राच्या सुरगाणा तालुक्याचे ग्रामस्थ पोहोचले गुजरातच्या तहसील कार्यालयात, सुरगाणा तालुक्यातील गावांना गुजरात मध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्यांना याच ठिकाणी ठेवले सुरक्षित
रात्रीच्या सुमारास या बछड्यांना आपल्या जबड्यात धरून घेऊन जाताना बिबट्याची मादी कॅमेऱ्यात कैद
पाथर्डी गावातील मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
याच परिसरात 20 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नर बिबट्या झाला होता जेरबंद
कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्या 3001 ईव्हीएम मशीन उपलब्ध
आणखी 739 ईव्हीएम मशीन लागणार
वाढीव ईव्हीएम मशीनसाठी जिल्हा निवडणूक विभागाने केली सोलापूरकडे मागणी
जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीची 18 डिसेंबरला होतेय निवडणूक
नंदुरबार : नवापूर पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधून चार ते पाच आरोपी खिडकी तोडून पळाल्याची माहिती, सकाळी आठच्या सुमारास घडली घटना
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट, भेटी दरम्यान दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा
अमरावती : साखरपुड्याच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा, अचानक अनेकांना सुरु झाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास
मुंबई एअरपोर्टवर 4712 ग्रॅम्स सोनं जप्त
सोन्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये
याप्रकरणी तीन जणांना अटक
Maharashtra | Mumbai Airport Customs seized a total of 4712 grams of gold worth Rs 2.5 cr in two cases and arrested 3 accused. Further investigation is underway pic.twitter.com/UkmC2yZFC1
— ANI (@ANI) December 5, 2022
सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथील महाप्रबोधन यात्रा मनसे उधळणार
उद्या सायंकाळी 6 वाजता सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथे सभा
मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी दिला इशारा
राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यावरून मनसे आक्रमक, माफी मागायची मागणी
देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचा इशारा
तरुण वर्गातून संताच्या अभंगाची तोडमोड करून शुभेच्छा पत्र तयार केलं जाते
संताच्या नावाचा वापर करून चुकीचे विडंबन करू नये
असं केल्यास देहू संस्थाच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार, संस्थानची माहिती
औरंगाबाद : दुचाकी चालकाची रिक्षा चालकाला बेदम मारहाण, दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद
अहमदाबाद : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी रवाना, थोड्याच वेळात बजावणार मतदानाचा हक्क
खासदार धनंजय महाडिक यांनी केली 65 सीटर डबल डेकर इलेक्ट्रिक बसची पाहणी
मुंबईहून चेन्नईकडे निघालेल्या डबल डेकर बसची कोल्हापुरात घेतली माहिती
शहरात 75 इलेक्ट्रिक डबल डेकर बस मिळवण्यासाठी महाडिक यांचा प्रयत्न
मुंबईत तयार झालेली बस कोल्हापूर मार्गे गेली चेन्नईला
मुंबई : 42 वर्षीय महिलेवर कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार, घरात घुसून महिलेवर हल्ला करुन तिच्यावर बलात्कारादरम्यान दिले सिगारेटचे चटके, तिघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींची शोध सुरु
एका वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुक्त सहभागी झाले होते
या वेळी उत्साहात असलेल्या आयुक्तांनी झिंगाट गाणे लागताच भांगडा स्टेप करत एकच माहौल निर्माण केला
कोपऱखैरणे, महापे, बोनकोडे, कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त प्रदूषित वायूचा नागरिकांना त्रास
नागरिकांना मळमळ तसेच श्वास घेण्यास अडचणी येत आहेत
त्यामुळे अशा प्रकारे वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे असेल
93 जागांसाठी आज होणार मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणार
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
8 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार
हात से हात जोडो अभियान देशभरात राबवलं जाणार
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचणार
26 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात हात से हात जोडो अभियान
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस करणार जोरदार तयारी