सांगली: राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. आता आलेलं संकटही मोठं आहे. पण काळजी करू नका. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार आपलं आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यात येईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोपच्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसले. (cm uddhav thackeray addresses flood affected people in sangli)
भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंकलखोपला आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. तुमच्यावर आपत्ती ओढवली. त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. त्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन. पण तुम्ही ज्या पद्धतीने गर्दी केली ते भयानक आहे. कारण कोरोना अजून गेला नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात सांगली आहे. त्यामुळे कोरोना होणार नाही याची काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
तुमच्या व्यथा आणि वेदना विश्वजीत कदम यांच्याकडे द्या. ते मला या नुकसानीची माहिती देत आहेत. त्यामुळे तुम्हाला मदत करू. पुरानंतर जे आजार येतात त्यातून वाचलं पाहिजेत. त्यासाठी मेडिकल कँम्प सुरू केलं आहे. तुम्हाला जे काही कमी पडेल त्याची मदत देऊ. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत. त्यापूर्ण करू. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहेत. त्यात तुमच्याबाबत काय काय करायचं ते करू, असंही त्यांनी सांगितलं.
पूर दरवर्षी येतो. दरवर्षी तुमचं घरदार वाहून जातं. त्या त्यावेळी मुख्यमंत्री, मंत्री येतात आणि मदत देतात. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या होतं. त्यामुळे काही कटू निर्णय घ्यावा लागेल. त्यावेळी तुमची साथ हवी. कारण जीवितहानी न होऊ देणं हे आपलं प्राधान्य आहे. केवळ नुकसान भरपाईच द्यायची नाही तर तुम्हाला पायावर उभं करण्याचं वातावरण तयार करण्यात येईल. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (cm uddhav thackeray addresses flood affected people in sangli)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 2 August 2021 https://t.co/69iC03S1LQ #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
संबंधित बातम्या:
संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही: मुख्यमंत्री
निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही; आता मुख्यमंत्रीच निर्णय घेणार: विजय वडेट्टीवार
(cm uddhav thackeray addresses flood affected people in sangli)