येवा कोंकण आपलोच आसा! कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात, कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार

| Updated on: Mar 01, 2022 | 1:31 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीच्या एका बोगद्याचे काम पूर्ण झाले.

येवा कोंकण आपलोच आसा! कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात, कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार
कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात, कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार
Follow us on

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावरील (mumbai-goa highway) अवघड घाट रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या कशेडी बोगद्याचे (kashedi ghat tunnel) काम पूर्णत्वाकडे आहे.मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरु आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीच्या एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत कामे सुरु आहेत. हे दोन्ही बोगदे तयार करण्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा (malaysian technology) वापर करण्यात आला आहे. या बोगद्यांसाठी 502 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार आहे. कशेळी घाटातील वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या घाटांमध्ये वारंवार अपघात होत असतात. आता नवीन बोगदे तयार झाल्याने कशेळी घाटातील अपघात होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तसेच या दोन्ही बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कशेडी घाटातील रस्त्यांचाही समावेश आहे. भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रूक असा हा महामार्ग आहे. या दोन्ही गावांच्या बाजूने पाच किलोमीटर अंतरावर दोन बोगदे तयार होत आहेत. त्यातील कशेडी ते भोगाव बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

सहा पूल, सहा मार्गिका

या दोन्ही बोगद्यांमध्ये सहा मार्गिका आहेत. म्हणजे बोगद्यातील सहा रस्त्यांवरून वाहतूक होणार आहे. यावरून या बोगद्याची व्याप्ती दिसून येते. याशिवाय बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास आत 300 मीटरवर छेद मार्ग ठेवण्यात आला आहे. दोन्ही बोगद्यांची उंची 12 असून लांबी जवळपास 2 किलोमीटर आहे. सध्या बोगद्यातील किरकोळ कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. या शिवाय भोगावच्या हद्दीतील सहा पुलांची कामेही मार्गी लावण्यात येत आहेत. 60 ते 220 मीटर लांबीचे हे पूल आहेत.

संबंधित बातम्या:

औरंगाबादेतून आजपासून दिल्ली, मुंबईसाठी दररोज फ्लाइट, येत्या 15 दिवसांत आणखी विमानांचे उड्डाण!

उद्धव ठाकरेंना सत्ता जाण्याची भीती म्हणूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत; दरेकरांचा हल्लाबोल

सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, दरेकरांचा आरोप; भाजपचे मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू